अजित पवारांवर फडणवीसांनी कारवाई का केली नाही? ओवेसींच्या मते 'हे' आहे कारण

अजित पवारांवर फडणवीसांनी कारवाई का केली नाही? ओवेसींच्या मते 'हे' आहे कारण

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवार यांना तुरुंगात टाकण्याची भाषा केली होती.'

  • Share this:

अमरावती, 1 एप्रिल : 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवार यांना तुरुंगात टाकण्याची भाषा केली होती. मात्र सिंचन घोटाळ्याप्रकरणी सरकारने कुणालाच तुरुंगात टाकलं नाही. कारण शिवसेना-भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी हे सर्व एकाच खानदानातील पक्ष आहेत,' असं म्हणत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

'मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनापैकी काहीच पूर्ण केलं नाही. दोन कोटी रोजगाराचं काय? 15 लाख गरिबांच्या खात्यात टाकणार होते त्याचं काय? नोटबंदीने अनेक पिढ्या बरबाद झाल्या त्याचं काय? या खोट्या आश्वासनानंतर या सरकारला आता खाली खेचत वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना साथ द्या,' असं आवाहन असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हेदेखील उपस्थित होते. त्यावेळी बोलताना ओवेसी यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.

'शिवसेना ही भाजपसमोर लाचार झाली'

'शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आणि त्यांच्या निधनानंतरची शिवसेना ही भाजपच्या समोर लाचार झाली असून मोदींसमोर शिवसेना मांजर झाली आहे,' असं म्हणत ओवेसींनी शिवसेनेच्या भूमिकेवर टीका केली आहे.

प्रकाश आंबेडकरांचे आश्वासन

'अमरावती जिल्हा रोजगाराचे साधन असताना हा जिल्हा विकासापासून वंचित आहे. विदर्भात कापूस, संत्रा मोठ्या प्रमाणात पिकतो. अमरावती जिल्ह्यात आम्ही संत्रा प्रकल्प उभारणार आहोत. त्यामुळे वंचित आघाडीच्या गुणवंत देवपारे या अमरावतीतील उमेदवाराला साथ द्या,' असं आवाहन या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

VIDEO: वडिलांचं नाव लावणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क - पंकजा मुंडे

First published: April 1, 2019, 6:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading