धक्कादायक! तरुणीला होता AIDS, आजार लपवून चौथ्यांदा केला विवाह

धक्कादायक! तरुणीला होता AIDS, आजार लपवून चौथ्यांदा केला विवाह

21 वर्षीय तरुणीला एड्सचा आजार झाला आहे. हे तिला माहित असतानादेखील तिने ही बाब इतरांशी लपवली.

  • Share this:

बुलढाणा, 07 ऑगस्ट : एड्सचा आजार झाला असतानी 4 तरुणांशी माहिती लपवून तरुणीने विवाह केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यामध्ये घडली आहे. बुलढाण्यामध्ये राहणाऱ्या तरुणीला एड्सचा आजार होता. पण तिने ही माहिती लपवून ठेवत सुरतच्या एका तरुणाशी विवाह केला. सगळ्यात धक्कादायक म्हणजे याआधीही तरुणीने 3 तरुणांशी फसवून विवाह केला होता. या सगळ्यामुळे बुलढाण्यात एकच खळबळ उडाली आहे.

21 वर्षीय तरुणीला एड्सचा आजार झाला आहे. हे तिला माहित असतानादेखील तिने ही बाब इतरांशी लपवली. तिने आधीच 3 तरुणांशी विवाह केला होता. त्यानंतर तरुणीने अशी फसवणूक करत सुरतच्या एका तरुणाशी विवाह केला. हा विवाह लावून देण्यामध्ये दिंडोईमध्ये राहणाऱ्या एका दलाल महिलेचा हात होता. तरुणीला एड्स झाला याबद्दल महिलेला कल्पना होतील पण तिने पैशांसाठी ही माहिती लपवून ठेवली.

इतर बातम्या - महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा रेड अलर्ट, धरणं ओव्हरफ्लो झाल्यामुळे महापुराचा धोका

लग्नाला 2 महिने झाल्यानंतर रात्रीच्या वेळी तरुणाने तरुणीला औषधं खाताना पाहिलं. कोणती औषध खात आहे असं विचारलं असता तिने वेगळी कारणं दिली. त्यानंतर तरुणाला शंका आली आणि त्याने तिच्या रक्ताची तपासणी केली. रक्ताचे रिपोर्ट आल्यानंतर मात्र तरुणाला धक्काच बसला. तरुणाला एड्स असल्याचं रिपोर्टमध्ये निदान झालं होतं. तरुणीचं पितळं उघडं पडल्याने त्या दोघांमझ्ये घटस्फोट झाला. एड्सचा आजार झाला असताना उपचाराची सगळ्यात जास्त गरज आहे. पण त्यात महिलेने 4 विवाह करत सगळ्यांची फसवणूक केली.

इतर बातम्या - सुषमा स्वराज यांच्याकडे होती 32 कोटींची संपत्ती, आता कोण असणार वारसदार?

तरुणीचा विवाह लावून देणाऱ्या दलाल महिलेने लग्न लावण्यासाठी तब्बल दीड लाख रुपये मुलाच्या घरच्यांकडून घेतले होते. यासंबंधी काही बोलणी करण्यासाठी बुलढाण्यामध्ये आले असता संतप्त तरुणाने महिलेला बेदम मारहाण केली. या सगळ्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

========================================================

Published by: Renuka Dhaybar
First published: August 7, 2019, 1:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading