मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Ahmednagar : शेवगाव तहसील कार्यालयासमोर तरुणाची आत्महत्या, Suicide note मधून धक्कादायक माहिती समोर

Ahmednagar : शेवगाव तहसील कार्यालयासमोर तरुणाची आत्महत्या, Suicide note मधून धक्कादायक माहिती समोर

अहमदनगरमध्ये तरुणाची आत्महत्या, आत्महत्येपूर्वीचा VIDEO आणि Suicide note मधून धक्कादायक माहिती समोर

अहमदनगरमध्ये तरुणाची आत्महत्या, आत्महत्येपूर्वीचा VIDEO आणि Suicide note मधून धक्कादायक माहिती समोर

Ahmednagar Farmer suicide: अहमदनगरमध्ये शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वीचा व्हिडीओ आणि सुसाईड नोट समोर आली आहे.

अहमदनगर, 1 डिसेंबर : एका तरुण शेतकऱ्याने तहसील कार्यालयाच्यासमोर आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सोमनाथ धनवट (Somnath Dhanvat suicide) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याने शेवगाव तहसील कार्यालयासमोर (Shevgaon Tehsil office) आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली सुसाईड नोट आणि शूट केलेला व्हिडीओ समोर आला आहे. शेवगाव तहसील कार्यालयासमोर असलेल्या झाडाला गळफास घेत त्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला. (Ahmednagar youth ends life, shocking information reveals from suicide note)

गंगामाई साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी कसा त्रास दिला आहे हे सांगून युवकाने आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर शेवगाव पोलीस ठाण्यात गंगामाई साखर कारखान्याच्या कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी विष्णू खेडेकर, अर्जुन मुखेकर, जगन्नाथ झाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा : 2020 मध्ये देशात 5579 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; सर्वाधिक शेतकरी महाराष्ट्रातले, धक्कादायक आकडेवारी समोर

काय म्हटलं आहे सुसाईड नोटमध्ये ?

मृत घनवट याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे की, "मी जवळच्या बाभूळगावचा रहिवासी असून, गंगामाई साखर कारखान्याला लागून आमची जमीन आहे. या कारखान्यांमुळे प्रदुषणामुळे पाणी व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यकृत निकामी झाल्याने माझ्या वडिलांचा मृत्यू झाला, तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीमुळे आम्ही आणि परिसरातील नागरिक त्रस्त आहोत, याबाबत कारखान्याकडे वेळोवेळी तक्रार करण्यात आली, मात्र दोन अधिकारी व एका कर्मचाऱ्याने धमकावले. मला आणि माझे नातेवाईक, त्यांनाही गुंडांना मारहाण करण्यास भाग पाडले गेले, त्यांच्यापैकी एकाने पोलीस अधिकाऱ्याला फोनवर धमकी दिली. दुसऱ्या दिवशी त्याला पोलीस ठाण्यात नेऊन अनेकवेळा साखर कारखानदार आणि वरिष्ठ पोलिसांनी धमकावले तसेच मारहाण केली. अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे" असे सोमनाथ दनवट याने आत्मह्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

वाचा : राज्यात पुढचे तीन दिवस पावसाचे, तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

साखर कारखान्याकडे जाणाऱ्या वाहनांमुळे आणि कारखान्यातील धूळ, धूर, प्रदूषणामुळे सोमनाथ धनवट याच्या शेतीचे नुकसान होत होते. या संदर्भात तो वारंवार तक्रारही करत होता.

आपल्यासोबत घडलेला प्रकार सोमनाथ याने एका व्हिडीओच्या माध्यमातूनही सर्वांसमोर आणला आहे. आत्महत्येपूर्वी सोमनाथ याने एक व्हिडीओ शूट केला होता. या व्हिडीओतून त्याने आपण कुठल्या परिस्थितीतून जात आहोत आणि कुठल्या प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे हे सांगितलं आहे. सोमनाथ याने लिहिलेली सुसाईड नोट आणि आत्महत्येपूर्वी शूट केलेला व्हिडीओ सोशल मीडियातही व्हायरल होत आहे.

First published:
top videos

    Tags: Ahmednagar, Crime, Suicide