मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कॉलेजच्या गेटसमोरून केलं अपहरण; बळजबरीनं लग्न लावत युवतीवर बलात्कार, नगरला हादरवणारी घटना

कॉलेजच्या गेटसमोरून केलं अपहरण; बळजबरीनं लग्न लावत युवतीवर बलात्कार, नगरला हादरवणारी घटना

Crime in Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी असणाऱ्या एका युवतीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार (kidnapped and raped) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Crime in Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी असणाऱ्या एका युवतीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार (kidnapped and raped) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Crime in Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी असणाऱ्या एका युवतीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार (kidnapped and raped) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

संगमनेर, 08 डिसेंबर: अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी असणाऱ्या एका युवतीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार (kidnapped and raped) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलेजसमोरून जात असताना, कारमधून आलेल्या चार आरोपींनी पीडित तरुणीचं अपहरण केलं होतं. आरोपींनी पीडितेला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात घेऊन जात, एकाने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला आहे. एवढंच नव्हे तर नराधमाने पीडित तरुणीचे नग्नावस्थेतील फोटो देखील काढले (Clicked obscene photos) आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक (4 accused arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

प्रवीण अरुण लगड (26), संकेत भगवान राणे (27), दर्शन शिवाजी हिरे (25) आणि राहुल कैलास वाघमारे (28) असं गुन्हा दाखल झालेल्या 4 आरोपींची नावं आहेत. संबंधित सर्वजण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 नोव्हेंबर रोजी पीडित तरुणी नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेरमधील एका कॉलेज समोरून जात होती. दरम्यान त्याठिकाणी कारमधून आलेल्या चौघांनी पिडित तरुणीला बळजबरी करत तिला कारमध्ये बसवून तिला सिन्नर येथील एका हॉटेलमध्ये घेऊन गेले.

हेही वाचा-Pune: मैत्रिणीच्या घरी जाऊन केला बलात्कार; लग्नाचं आमिष दाखवून मिटवलं प्रकरण पण

याठिकाणी गेल्यानंतर आरोपी प्रवीण लगड याने पीडित तरुणीला मारहाण केली. तसेच तिला उग्र वास येणारं शीतपेय पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने पीडितेचे अश्लील फोटो देखील काढले. दुसऱ्यादिवशी सकाळी आरोपीनं पीडितेशी बळजबरी करत तिच्याशी विवाह केला. आणि लग्नाची नोंदणी करण्याच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या. यानंतरही आरोपीनं पीडितेला पुन्हा एका लॉजवर घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे.

हेही वाचा-'बर्थ डे' पार्टीला बोलावून पाजली दारू; पुण्यातील तरुणीवर तळजाई जंगलात बलात्कार

यानंतर आरोपींनी पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत, सिन्नर पोलीस ठाण्यात आणून 'मी माझ्या मर्जीने निघून आली असून मला कोणीही पळवून आणलं नाही' असा जबाब देण्यास बजावलं. पोलिसांनी संबंधित जबावावर पीडितेची सहीही घेतली आहे. त्यानंतर पीडित तरुणी आपल्या नातेवाईकांसोबत संगमनेर याठिकाणी आली. आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पीडितने संगमनेर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

First published:

Tags: Ahmednagar, Crime news, Rape