मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कौतुकास्पद! कोरोनानं हिरावला पती; नगरमधील तरुणानं विधवेशी लग्न करत दिला आयुष्यभराचा आधार

कौतुकास्पद! कोरोनानं हिरावला पती; नगरमधील तरुणानं विधवेशी लग्न करत दिला आयुष्यभराचा आधार

गेल्या काही काळापासून महाराष्ट्रासह देशात कोरोना विषाणूनं थैमान (Corona pandemic) घातलं आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने अनेकांनी आपल्या जीवाभावाची माणसं गमावली (Corona deaths) आहेत.

  • Published by:  News18 Desk

अहमदनगर, 07 डिसेंबर: गेल्या काही काळापासून महाराष्ट्रासह देशात कोरोना विषाणूनं थैमान (Corona pandemic) घातलं आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने अनेकांनी आपल्या जीवाभावाची माणसं गमावली (Corona deaths) आहेत. त्यामुळे देशात अनेक महिला विधवा झाल्या आहेत. अशा विधवा महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारकडून तुटपुंजी मदत केली जात आहे. पण नगरमधील एका तरुणानं मात्र समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवत एका विधवा महिलेशी विवाह (Marriage with widow woman) केला आहे. त्याने संबंधित महिलेला आणि तिच्या नऊ महिन्याच्या बाळाला आयुष्यभराचा आधार दिला आहे.

या अनोख्या लग्नामुळे संबंधित तरुणाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. तसेच काही स्वयंसेवी संस्थांनी सरसावत दाम्पत्याला भरीव मदत केली आहे. किशोर राजेंद्र ढुस असं संबंधित तरुणाचं नाव असून तो अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील रहिवासी आहे. याच भागातील रहिवासी असणाऱ्या महिलेच्या पतीचं काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झालं होतं. पदरी नऊ महिन्याचं बाळ असणाऱ्या महिलेच्या पतीनं अशी अचानक साथ सोडल्यानं संबंधित महिलेवर दु:खाचा डोंगर कोसळला होता.

हेही वाचा-कतरिना-विकीला OTT ने दिली मोठी ऑफर! लग्नाच्या फोटो-व्हिडीओसाठी देणार इतके कोटी

पण देवळाली प्रवरा येथील किशोर यानं संबंधित महिलेशी लग्न करून बाळासह तिचा स्वीकार करण्याची तयारी दर्शवली. दोन्ही बाजूंनी संमती मिळाल्यानंतर हा अनोखा विवाह पार पडला आहे. यावेळी राहुरीचे तहसिलदार फसियोद्दीन शेख, राहुरी फॅक्टरी येथील अर्बन निधी संस्था व देवळाली प्रवरा हेल्थ टीम यांनी संबंधित लग्नासाठी पुढाकार घेतला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ काळे यांनी ढुस दाम्पत्याचा सत्कार केला. त्यांना कपडे व वस्तू भेट देण्यात आल्या.

हेही वाचा-'या' शेतकऱ्यांना मिळणार PM Kisan चा 10वा हप्ता, मोदी सरकारने जारी केली यादी

विशेष म्हणजे राहुरी फॅक्टरी येथील अर्बन निधी संस्थेतर्फे बाळाच्या नावावर अकरा हजार रुपयांची मुदत ठेव ठेवण्यात आली. यावेळी याची पावतीही ढुस दाम्पत्यांना देण्यात आली. राहुरी याठिकाणी हा अनोखा विवाह पार पडल्यानं संबंधित तरुणाचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

First published:

Tags: Ahmednagar, Corona, Marriage