Home /News /maharashtra /

गंमती गंमतीत चालवली गोळी आणि गेला जीव, दिराकडून भावजयच्या डोक्यात गोळी, अहमदनगर हळहळलं

गंमती गंमतीत चालवली गोळी आणि गेला जीव, दिराकडून भावजयच्या डोक्यात गोळी, अहमदनगर हळहळलं

गंमती गंमतीत बंदूक दाखवत असताना दिराकडून भावजयीला गोळी लागली. या घटनेत भावजयीचा मृत्यू झाला आहे.

सुनिल दवंगे, प्रतिनिधी अहमदनगर, 7 जुलै : कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय. गंमती गंमतीत बंदूक दाखवत असताना दिराकडून भावजयीला गोळी लागली आहे. भावजयी सुनीता भालेराव गोळीबारात मयत झाल्या आहेत. घटनेनंतर आरोपी विशाल भालेराव घटनास्थळाहून फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेवून त्यास अटक केली आहे. तर त्याच्या सोबतचे दोन मित्र अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, मयत सुनिता भालेराव यांचा मुलगा कल्पेश भालेराव याने याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. "आई सुनीता भालेराव आज सकाळी केसांना कोरपड लावत होती. याच दरम्यान फिर्यादीचा चुलता आणि त्याचे दोन मित्र घरात आले. आईला म्हटले की, वहीनी बघ मी बंदूक आणली. याच वेळी आरोपी सिद्धार्थ याला चुलता विशाल यांनी विचारले की बंदूक कशी चालते? सिद्धार्थने देखील बंदूक हातात घेत खटका मागे ओढून पुन्हा विशालच्या हतात दिली. यावेळी घरातील व्यक्तींनी विरोध केला. मात्र चुलते विशाल यांनी फक्त वहीनीला दाखवण्यास आणल्याचे सांगातले", अशी माहिती मृतक महिलेच्या मुलाने पोलिसांना दिली आहे. "थट्टा-मस्करीत बंदूक हाताळाणे सुरु होते. याच दरम्यान चुलते विशाल यांच्याकडून ट्रिगर दाबल्या गेल्या आणि आईच्या डोक्यात गोळी लागली. यावेळी आई सुनीता भालेराव रक्ताच्या थोराळ्यात पडल्या. तर आरोपी विशाल भालेराव, सिद्धार्थ कदम आणि अमोल भालेराव हे तिघे ही बंदूक आणि गोळ्या घेवून फरार झाले", असं कल्पेश भालेरावने पोलिसांना सांगितलं. (देवेंद्र फडणवीसांना आधी उपमुख्यमंत्री केलं, आता कॅबिनेटवरही राहणारा नाही होल्ड) दीर विशाल भालेराव याच्याकडून डोक्यात गोळी लागलेल्या सुनीता भालेराव यांना उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. फरार आरोपी विशाल भालेराव याला पोलिसांनी अटक केली असून आणखी दोघे आरोपी गायब आहेत. संबंधित घटना घडल्यानंतर भालेराव कुटुंबियांना पोलीसांनी तपासासाठी शिर्डी पोलीसस्टेशनमध्ये आणण्यात आले. दरम्यान फरार आरोपी विशाल याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. गमंती गंमतीत पिस्टल दाखवत असताना गोळी झाडली गेल्याने पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी विना परवाना शस्त्र वापरणे, त्याचबरोबर इतर कलमा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. भादवि 304 , 201 34, 3, 27 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: Ahmednagar, Ahmednagar News, Crime

पुढील बातम्या