मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अहमदनगरच्या स्मशानभूमीतून का गायब होतेय मृतदेहांची राख? समोर आलं धक्कादायक कारण

अहमदनगरच्या स्मशानभूमीतून का गायब होतेय मृतदेहांची राख? समोर आलं धक्कादायक कारण

अहमदनगरच्या स्मशानभूमीतून गायब होतेय मृतदेहांची राख

अहमदनगरच्या स्मशानभूमीतून गायब होतेय मृतदेहांची राख

अहमदनगरच्या एका गावाच्या स्मशानभूमीत घडत असलेल्या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

  • Published by:  Chetan Patil
अहमदनगर, 15 सप्टेंबर : अहमदनगरच्या एका गावाच्या स्मशानभूमीत घडत असलेल्या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावात संबंधित प्रकार उघड झाला आहे. करंजी गावाच्या स्मशानभूमीत सध्या एक विचित्र प्रकार घडतोय. रात्रीच्या अंधारात स्मशानभूमीतून मृतदेहांची संपूर्ण राख अचानक गायब होतेय. त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गावकऱ्यांमध्ये प्रचंड कुजबुज सुरु आहे. मृतदेहांची राख नेमकी कुठे गेली? असा प्रश्न अनेकांना सतावत होता. अखेर आता त्यामागचं कारण समोर आलं आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील स्मशानभूमीतील राखेला चक्क पाय फुटल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. अंत्यविधीनंतर उरणारी राख अगदी अस्थीसह गायब होत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. आतापर्यंत तीन ते चार वेळा अशा घटना घडल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. (तुमचं दूध कुत्र्याने चाटलं तर नाही ना? धक्कादायक Video समोर आल्याने खळबळ) करंजी गावातील लिलाबाई वामन यांचे सोमवारी दुःखत निधन झाले. करंजी गावातील उत्तरेश्वराच्या मंदिराजवळ त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांचे नातेवाईक अस्थी घेण्यासाठी स्मशानभूमीत गेले तर त्यांच्या अस्थी गायब होत्या. लिलाबाई यांच्या अंगावर पावणे दोन तोळे सोने होते. त्यांना नथ घालण्याची हौश होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी त्यांना नवीन नथ घातली होती. दरम्यान, दाग दागिने गेले याचे दुःख वाटत नाही. पण काही घटनांमध्ये थेट अस्थीच चोरून नेल्या जात असल्याने संताप व्यक्त होतोय. महिलांचीच राख चोरीला जात असल्याने मृत महिलेच्या राखेतील दागिण्यांचे आमिषापोटी या घटना घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आतापर्यंत तीन ते चार वेळेला असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे मृत व्यक्तींच्या नातेवाईकांच्या भावनेशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
First published:

Tags: Ahmednagar, Ahmednagar News

पुढील बातम्या