मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : भन्नाट उपक्रमातून मुलांना शाळेची गोडी, तुम्हीही म्हणाल वा, क्या बात है!

Video : भन्नाट उपक्रमातून मुलांना शाळेची गोडी, तुम्हीही म्हणाल वा, क्या बात है!

शाळेतील आदर्श शिक्षक विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • ahmednagar, India

अहमदनगर, 25 नोव्हेंबर : महाराष्ट्रात वाड्या-वस्त्यावर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत. यातील काही शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. मात्र, काही शाळा या शिक्षण विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत आहेत. नगर  जिल्ह्यात देखील अशीच एक जिल्हा परिषदेची शाळा आहे. शाळेतील आदर्श शिक्षक विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करतात. शाळेतील उपक्रम आणि गुणवंत विद्यार्थी पाहता शाळा आदर्शवत ठरत आहे. 

नगर जिल्ह्यातील दत्तवाडी शाळा हे एक शैक्षणिक तीर्थक्षेत्र आहे. तेथे विद्यार्थ्यांना केवळ चार भिंतीतलं पुस्तकी ज्ञान न देता त्या चौकटी बाहेर देखील विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक व भावनिक विकास साधत जातो. आध्यात्मिक संस्कारांची जोड देताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, ही भावना बालकांमध्ये रुजवून सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. शाळेतील आदर्श शिक्षक विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करतात.

जामखेड-करमाळा रस्त्यालगत दत्तवाडी जिल्हा परिषद शाळा आहे. दत्तवाडी जेमतेम पन्नास साठ घरांची लोकवस्ती आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणातून धोंडपारगाव या गावातर्गत ही शाळा 1992 साली स्थापन झाली. उपक्रमशील मुख्याध्यापक मनोहर इनामदार यांच्या संकल्पनेतून शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. शाळेच्या उपक्रमाला विद्यार्थी आणि गामस्थांचेही चांगले सहकार्य मिळते. सांस्कृतिक सभागृहाचं काम लवकरच पूर्णत्वास गेल्यानं शाळेचं रूप बदलायला लागलं. शाळेसाठी संरक्षण भिंत, बैठक कट्टे यांसह विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी शाळेचं केलेलं रंगकाम हा तर मोठा कौतुकाचा विषय ठरला. शाळेत व्यासपीठाची निर्मिती, ध्वनिक्षेपक साधन सामग्री यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्यानं लोकवर्गणी करत शाळेच रूपडं बदललं आहे. नुकतीच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल नऊ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यावरून शिक्षणाचा दर्जा लक्षात येतो.

Video : नोकरी करण्यापेक्षा देणारे बना! सरकारकडून मिळेल मोफत मार्गदर्शन

शाळेतील उपक्रम

मिशन आपुलकी, सांस्कृतिक सभागृह, लोकवस्ती निर्मिती, व्यासपीठ बांधकाम, शालेय रंगकाम, वेशभूषा साहित्य, ध्वनिक्षेपक सामग्री, लक्षवेधी उपक्रम, एक दिवस वंचितांसाठी, आजीआजोबा मेळावा,आदर्श माता पुरस्कार लेजीम पथक, संरक्षण भिंत बांधकाम पालकांसह शैक्षणिक, सहल, गुणवंतांचा सन्मान, सांस्कृतिक महोत्सव, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर, असे उपक्रम शाळेत राबवण्यात येत आहेत.

मुलांसह पालकांचीही सहल

ग्रामीण भागांतील पालकांना संसाराच्या व्यापातून भ्रमंतीसाठी सवड मिळत नाही, म्हणून शाळाच दरवर्षी पालकांसह विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल काढते. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही धार्मिक स्थळांसह गडकिल्ल्यांसारख्या ऐतिहासिक तसंच भौगोलिक, सामाजिक व शैक्षणिक पर्यटन स्थळाचं नियमित दर्शन घडतं. धोडपारगाव पंचक्रोशीत शिक्षणासोबत एकोप्याचं व आपुलकीचं वातावरण निर्माण करण्याचं काम मनोहर इनामदार आणि हरिदास पावणे हे शिक्षक मोठ्या तळमळीने करत आहेत.

First published:

Tags: Ahmednagar, Local18