मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अहमदनगरमध्ये भीषण अपघात, ट्रकने दुचाकीला फरफटत नेलं, ग्रामस्थ आक्रमक, महामार्गावर राडा

अहमदनगरमध्ये भीषण अपघात, ट्रकने दुचाकीला फरफटत नेलं, ग्रामस्थ आक्रमक, महामार्गावर राडा

अहमदनगर अपघात

अहमदनगर अपघात

अहमदनगरमध्ये एक भीषण अपघात घडला. एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. ही धडक फार भयानक होती.

  • Published by:  Chetan Patil
अहमदनगर, 1 सप्टेंबर : अहमदनगरमध्ये एक भीषण अपघात घडला. एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. ही धडक फार भयानक होती. ट्रकची धडक बसल्यानंतर दुचाकी ट्रकखाली जावून काही अंतरावर ओढत गेली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या दुचाकीस्वारास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. सुनील साळवे असं जखमी तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही नगर-दौंड महामार्गावर घडली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थ संतप्त झाले. संतप्त ग्रामस्थांनी बाबुर्डी बेंड परिसरात रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी नागरिकांनी रस्त्याच्या कडेला गॅस पाईपलाईनचे काम सुरू असल्याने हे अपघात होत असल्याचा आरोप केला. गेल्या वर्षभरापासून गॅसची पाईपलाईन रोडच्याकडेला पडून आहे. ही पाईपलाईन उद्यापर्यंत न हलवल्यास अधिकाऱ्यांना चोप देण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिला. (मनसे पदाधिकाऱ्यांची दादागिरी, महिलेला केलेल्या बेदम मारहाणीचा VIDEO व्हायरल) या रस्ता रोको आंदोलनामुळे अर्धा तास ट्रॅफिक जाम झाली होती. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलिसांच्या माध्यस्तीनंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र गेल्या महिन्याभरापासून या महामार्गावर अनेक अपघात झाल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे.
First published:

Tags: Ahmednagar, Ahmednagar News

पुढील बातम्या