Home /News /maharashtra /

'तुम्ही लिहून घ्या, हे सरकार कोसळणारच' आदित्य ठाकरे बंडखोरांवर गरजले

'तुम्ही लिहून घ्या, हे सरकार कोसळणारच' आदित्य ठाकरे बंडखोरांवर गरजले

या चाळीस लोकांनी बंड केलचं नाही,  उठाव केलाच नाही, कारण बंड आणि उठाव करण्यासाठी ताकद लागते

या चाळीस लोकांनी बंड केलचं नाही, उठाव केलाच नाही, कारण बंड आणि उठाव करण्यासाठी ताकद लागते

या चाळीस लोकांनी बंड केलचं नाही, उठाव केलाच नाही, कारण बंड आणि उठाव करण्यासाठी ताकद लागते

    सुनिल दवंगे, प्रतिनिधी शिर्डी, 24 जुलै : 'गद्दारांनी एकत्र येवून घटनाबाह्य, बेकायदेशीर बेईमानीच सरकार बनवलं आहे. तुम्ही लिहून घ्या, हे  सरकार (shinde government) कोसळणारच आहे. विधानभवनात जे सुरू आहे ते पाहून माझ ही मन आतल्या आत खात होतं. या 40  लोकांना काय कमी केलं म्हणून यांनी गद्दारी केली' असं म्हणत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (aditya thackery) यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे जोरदार आक्रमक झाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा आयोजित करु महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. आदित्य यांनी जिल्हा पातळीवर मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे त्याला कट्टर शिवसैनिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळतो आहे. आदित्य ठाकरे सध्या अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असताना शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीवर भगव्या रंगाची शॉल अर्पण करत बाबांची आरती केली आहे. देवा पुढं गेल्यावर दुसरं काही मनात येतचं नाही फक्त साईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे येत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी साईदर्शनानंतर म्हटलं. सकाळ पासूनच आदित्य ठाकरे यांचा ताफा औरंगाबादहून गंगापूर मार्गे नगरजिल्ह्यात आला. यावेळी शेवगाव, नेवासा, श्रीरामपुर, बाभळेश्वर, राहाता, शिर्डी अशा ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले. राहाता शिर्डी दरम्यान कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांचा ताफा थांबवून त्यांचे स्वागत केले आहे. बंडखोरांच्या माथी गद्दारीचा शिक्का शिर्डीतील मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर अतिशय कडक टीका केली आहे. वडील आजारी आणि संकटात असताना यांनी स्वत: पुढे येवून साथ देण अपेक्षीत होत मात्र यांनी माझ्या वडीलांसोबत गद्दारी केली. त्यांच्या पाठीत खंजिर खूपसला असून आता या बंडखोरांच्या कपाळी गद्दारीचा शिक्का बसला आहे जो कधीच मिटणार नाही. त्यांना अजीर्ण झालं ही आमचीच चूक 'गद्दारांनी एकत्र येवून घटनाबाह्य, बेकायदेशीर बेईमानीच सरकार बनवलं आहे. तुम्ही लिहून घ्या, हे  सरकार कोसळणारच आहे. विधानभवनात जे सुरु आहे ते पाहून माझ ही मन आतल्या आत खात होतं. या 40  लोकांना काय कमी केलं म्हणून यांनी गद्दारी केली, मला वाटतं आपण यांना जास्त दिलं आणि हिच आपली चूक झाली. त्यांना अपचन झाले ज्यासाठी आम्ही कारणीभूत आहोत. कठीण काळात त्यांनी उद्धव साहेबांची सोडून जाण अपेक्षित नव्हत. मी तुमच्यासाठी शिंदे गटातून बाहेर पडत हे या आमदारांकडून अपेक्षित होतं,  असं यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. साईबाबांचे वस्त्र आणि नाव अंगावर आहे मी कधीच खोट बोलत नाही. गद्दार नेहमी म्हणतात ना की, उद्धव ठाकरे भेटत नव्हते हे खरं आहे. कारण दिवाळीनंतर त्यांची दोन शस्त्रक्रिया झाली होती. तरी त्यांनी काम सुरू ठेवले. एकीकडे उद्धवसाहेब कोविडमधून महाराष्ट्र बाहेर कसा काढायचा याचं काम करत होते तर दुसरीकडे हे गद्दार फोडाफो़डी करत होते. तरी ही माझ्या मनात त्यांच्या विषयी राग , व्देष नाही तर दुख आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच तर नाव ही घ्यावं वाटत नाही. मागील पाच वर्षात ते शिर्डी लोकसभा मतदार संघात दिसलेच नाही तरी त्यावेळी लोकसभेला मी त्यांच्या वतीनं जनतेची माफी मागितली. तेव्हा ते कुठं मुंबईत बसत होते ते त्यांनाच माहीत आपल्याला त्यात जायचं नाही असं म्हणत खासदार लोखंडे यांचा ही चांगलाच समाचार घेतला. या चाळीस लोकांनी बंड केलचं नाही,  उठाव केलाच नाही, कारण बंड आणि उठाव करण्यासाठी ताकद लागते,  तुम्ही समोर येवून म्हटला असता तर तो उठाव किंवा बंड झाले असते. मात्र त्यांनी केली ती गद्दारी केली आहे. याला बंड किंवा उठाव म्हणताच येणार नसल्याचं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या