मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'...तर राज्यात पुन्हा मास्कसक्ती करावी लागेल', राजेश टोपेंचा स्पष्ट इशारा

'...तर राज्यात पुन्हा मास्कसक्ती करावी लागेल', राजेश टोपेंचा स्पष्ट इशारा

'महाराष्ट्राने जिथे दररोज 63000 रुग्ण पाहिले, तिथे 900 सक्रिय रुग्ण असणे म्हणजे चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही मात्र

  • Published by:  sachin Salve

जामखेड, 02 मे :  'कोरोनाची (maharashtra corona case) रुग्ण संख्या एवढ्या प्रमाणात वाढत नाहीये की त्यामुळे चिंता करावी लागेल. पण रुग्णसंख्या  वाढली तर नक्कीच राज्यात मास्कसक्ती करावी लागेल असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajsh tope) यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे.

जामखेड येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना टोपे यांनी कोरोनाच्या परिस्थितीबाबत माहिती दिली.

'महाराष्ट्राने जिथे दररोज 63000 रुग्ण पाहिले, तिथे 900 सक्रिय रुग्ण असणे म्हणजे चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही मात्र आरोग्य विभाग संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून आहे. कोरोनाची रुग्ण संख्या एवढ्या प्रमाणात वाढत नाहीये की त्यामुळे चिंता करावी लागेल. पण रुग्णसंख्या  वाढली तर नक्कीच राज्यात मास्कसक्ती करावी लागेल, असं टोपे यांनी स्पष्ट केलं.

(होणाऱ्या जावयाने मेव्हणीला नेलं पळवून, मुलीच्या कुटुंबाने घेतला टोकाचा निर्णय)

तसंच, 'आयुर्वेदिक, युनानी आणि होमिओपॅथिक उपचार राज्य सरकारच्या महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये समावेश करणार असल्याचंही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

'सध्या या योजनेचा फायदा एखाद्या नामांकित आयुर्वेदीक हॉस्पिटल होत असून या योजनेत अनेक उपचार यामध्ये घेता येतील 2024 मध्ये नव्याने योजनेच्या आराखडा तयार होईल त्यावेळी आम्ही प्रयत्न करू, असं टोपे म्हणाले.

(घरी बोलावून प्रेयसीचा गळा दाबून केला खून, मृतदेह फेकला नाल्यात)

'सध्या राज्यात उष्मा वाढला आहे, त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं. बाहेर पडताना उन्हापासून संरक्षण त्यासाठी काळजी घ्यावी' असं आवाहनही टोपे यांनी केलं.

राज ठाकरेंमध्ये 360 डिग्री बदल कसा?

दरम्यान,  एकेकाळी पवार साहेबांची स्तुती करणाऱ्या राज ठाकरेंमध्ये एकदम 360 डिग्री बदल कसा झाला? याचे गमक माझ्यासारख्याला कळत नाही, असं म्हणत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.  तसंच, 'दोन वर्षांपर्यंत पवार साहेब एक आदर्श नेते आहेत, असं जे म्हणायचे ते आज त्यांनाच जातीवादी म्हणतात. मला असं वाटतं की कुठेतरी पाणी मुरतंय, असा संशयही टोपे यांनी व्यक्त केला.

First published: