मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊद्या; तुम्ही चौकशी कराच, दानवेंचे थेट उदय सामंतांना आव्हान

दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊद्या; तुम्ही चौकशी कराच, दानवेंचे थेट उदय सामंतांना आव्हान

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

अहमदनगर, 1 डिसेंबर:  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  जुने उकरून काढायची सवयच सरकारला लागलेली आहे, परंतु यांनी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का जात आहेत याचं उत्तर आधी दिलं पाहिजे असं दानवे यांनी म्हटलं आहे. आमच्या कितीही चौकशा केल्या तरी काही फरक पडत नाही.  उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकारने चांगलं काम केलेलं आहे. मात्र तरीही राज्याचे उद्योगमंत्री चौकशी करत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे. यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल असं दानवे यांनी म्हटलं आहे.

भाजपाला टोला  

दरम्यान त्यांनी यावेळी शिवरायांच्या मुद्द्यावरून भाजपाला देखील टोला लगावला आहे.  छत्रपती शिवरायांचा अवमान राज्यपालांनी केला. त्यानंतर काल परवा मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केली. याचा अर्थ शिवरायांचा अवमान तुम्ही सहन करताय. यावर उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे बोलत आहेत, पण त्यांच्या बोलण्याची दखलही सरकार घेत नाही. यामुळे महापुरुषांच्या बदनामीला राज्य सरकार आणि केंद्र सरकार पाठिंबा देत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : पुढची मुख्यमंत्री महिलाच असेल; उद्धव ठाकरेंच्या विधानाने पुन्हा चर्चांना उधाण

  अनेक शेतकऱ्यांना मदतच मिळाली नाही  

पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की,  अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत सगळ्या विभागातून राज्य सरकारकडे प्रस्ताव पोहोचलेले आहेत, परंतु अजूनही सरकारने हे प्रस्ताव पूर्णपणे स्वीकारलेले नाही.  अतिवृष्टीची मदत सुद्धा काहींना मिळाली तर अनेक जण अजूनही मदतीपासून वंचित आहेत. सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत संवेदनशील नसल्याचा आरोपही यावेळी दानवे यांनी केला आहे.  विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करत नाही, रिजेक्शनचं प्रमाण देखील वाढलं असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :  बेईमान व्यक्तींची शिवरायांशी तुलना हा तर महाराष्ट्राचा अपमान, संजय राऊत लोढांवर भडकले

वाळू तस्करीच्या घटना वाढल्या

राज्यात वाळू तस्करी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. खानपट्ट्यांना परवानगी नसल्याने बेकादेशीर उत्खनन होत आहे, राज्यामध्ये अनेक ठिकाणी वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्याच्या घटना ऐकायला मिळत आहेत. याचा अर्थ हे सर्व अनाधिकृतपणे सुरू आहे. याला कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे अशी मागणीही यावेळी दानवे यांनी केली आहे.

First published: