मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

काय सांगता, चक्क सोन्याच्या कपात प्रेमाचा चहा; अहमदनगरमध्ये या ठिकाणी मिळतोय...

काय सांगता, चक्क सोन्याच्या कपात प्रेमाचा चहा; अहमदनगरमध्ये या ठिकाणी मिळतोय...

याच सोन्याच्या कपात चहा विकली जातेय.

याच सोन्याच्या कपात चहा विकली जातेय.

चहा हा प्रत्येकाचा तसा आवडता विषय आहे. अनेकजण दिवसभरात एक तरी कप चहा होतोच. पण हाच चहा आता खऱ्या खुऱ्या सोन्याच्या कपात मिळतोय.

  • Published by:  News18 Desk
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी अहमदनगर, 22 ऑगस्ट : चहा हे असं पेय आहे, सकाळी उठल्याबरोबर सर्वांना हवं असतं. चहाविना बहुतांश लोकांची सकाळ होत नाही. त्यातही आता लेमन टी, ग्रीन टी, आल्याचा चहा यासांरखे चहाचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. त्यात अनेकदा कुल्लड चहाही अनेकांना आवडतो. मात्र, तुम्ही विचारही केला नसेल, एका चहा विक्रेत्याने चक्क सोन्याचा कपात चहा विकायला सुरुवात केली आहे. सोन्याच्या कपात चहा -  सोन्याच्या कपात चहा, आश्चर्य वाटतंय ना? तर हो हे खरंय. अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात प्रेमाचा चहा आता चक्क आता सोन्याच्या कपात मिळतोय. सकाळ झाली की प्रत्येकाला चहा हवा असतो. चहा हा प्रत्येकाचा तसा आवडता विषय आहे. अनेकजण दिवसभरात एक तरी कप चहा होतोच. पण हाच चहा आता खऱ्या खुऱ्या सोन्याच्या कपात मिळतोय. पारनेर तालुक्यातील स्वप्नील पुजारी यांनी आपल्या 'प्रेमाचा चहा'च्या दुकानात सोन्याच्या कपातून ग्राहकांना चहा देण्याची सुविधा सुरू केली आहे. सहा लाख रुपये खर्चून त्यांनी दोन सोन्याचे कप बनविले आहेत. या माध्यमातून त्यांच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना सोन्याच्या कपात हा चहा प्यायला मिळतो आहे. तसेच येथे येणाऱ्या ग्राहकांची सोन्याच्या कपात चहा पिण्याची इच्छा पूर्ण होत आहे. हेही वाचा - औरंगाबादचा समोसा-रस्सा राईस खाल्ला का? नाश्ता करण्याची पहिली चॉईस, पाहा VIDEO किंमतीत बदल नाही - अनेकांना वाटत असेल, की सोन्याच्या कपात चहा विकली जाते आहे, म्हणजे मग या चहाची किंमत महाग असेल. सोन्याच्या कपात विकल्या जाणाऱ्या चहाच्या किंमतीबाबत अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झालं असेल. मात्र, असं काहीही नाही. एरवी ज्या दरात चहा विकली जाते, त्याच दरात पारनेर तालुक्यातील स्वप्नील पुजारी यांच्या चहाच्या दुकानात सोन्याच्या कपात ही चहा ग्राहकांना प्यायला मिळत आहे.
First published:

Tags: Ahmednagar News, Gold, Tea

पुढील बातम्या