Home /News /maharashtra /

आपल्याला शिकवण्यासाठी वडिलांनी शेतात चालवले ट्रॅक्टर, मुलाने भेट दिली एमजी हेक्टर!

आपल्याला शिकवण्यासाठी वडिलांनी शेतात चालवले ट्रॅक्टर, मुलाने भेट दिली एमजी हेक्टर!

पोटापुरती जेमतेम शेती असलेल्या आई-वडिलांना लग्नाच्या वाढदिवशी एमजी हेक्टर कार (mg hector car) भेट दिली.

पोटापुरती जेमतेम शेती असलेल्या आई-वडिलांना लग्नाच्या वाढदिवशी एमजी हेक्टर कार (mg hector car) भेट दिली.

पोटापुरती जेमतेम शेती असलेल्या आई-वडिलांना लग्नाच्या वाढदिवशी एमजी हेक्टर कार (mg hector car) भेट दिली.

कोपरगाव, 24 जुलै : आपल्या आई-वडिलांनी शेतात काबडकष्ट करून आपल्याला लहानाचं मोठं केलं. आपल्या वडिलांनी घेतलेल्या कष्टामुळे आपण पायावर उभं राहिलो या कृतघ्न भावनेतून शेतकऱ्यांच्या मुलाने वडिलांना अनोखे गिफ्ट दिले. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या आणि पोटापुरती जेमतेम शेती असलेल्या आई-वडिलांना लग्नाच्या वाढदिवशी एमजी हेक्टर कार (mg hector car) भेट दिली. एका मुलाने आई-वडिलांना दिलेल्या या लाखोमोलाच्या गिफ्टची गावात चर्चा रंगली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द या गावात राहणारे यमाजी बाबुराव पुंगळ आणि त्यांच्या सौभाग्यवती अनुसया यमाजी पुंगळ यांच्या मुलाने लग्नाच्या वाढदिवसाला एमजी हेक्टर ही गाडी भेट दिली. यमाजी पुंगळ दाम्पत्यांना पाच मुली आणि एक मुलगा. एकुलता एक मुलगा बाबासाहेब यमाजी पुंगळ याचे दहावीपर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल चांदेकसारे येथे झाले व पुढील शिक्षण घेण्यासाठी पुण्याला जावे लागले. दहावीत चांगले मार्क मिळाल्याने त्यास शिष्यवृत्ती मिळून पुण्यातील इंजीनियरिंग गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक व एमआयटी पुणे येथे मोफत प्रवेश मिळाला. घरची परिस्थिती नाजूक असल्याने शिक्षण घेण्याकरिता कमवा व शिका या योजनेअंतर्गत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी वीस वर्ष पुण्यात नोकरी केली. तसेच बुद्धीच्या जोरावर पुढील पाच वर्ष साऊथ कोरिया या देशात नोकरी केली. (VIDEO:आई-वडील प्रवास करत होते त्याच विमानाचा पायलट होता मुलगा; अचानक भेटले अन्..) आपल्या गावासह परिसरातील शेतकऱ्यांची मुले ही फक्त शेतीवर अवलंबून न राहता उच्च शिक्षण घेण्याकरिता बाहेर पडावे आणि ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी बाबासाहेब यमाजी पुंगळ आणि त्यांच्या पत्नी निर्मला बाबासाहेब पुंगळ या दाम्पत्यांनी स्वतःच्या कष्टाच्या आणि मेहनतीच्या जोरावर एक आधुनिक यंत्राचे स्पेअर पार्ट बनवण्याचा कारखाना उभारून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. ज्या मातापित्यांनी आपल्याला घडवले व उच्च पदापर्यंत नेऊन बसवले त्यांचे ऋण फेडून त्यांचा मानसन्मान कसा करता येईल ह्या हेतूने आई-वडिलांचा लग्नाचा 55 वा वाढदिवस आणि स्वतःचा लग्नाचा 25 वा वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेतील शिक्षक आणि वर्ग मित्र यांना बोलावून कार्यक्रमाचे आयोजन केले. (महिला शिक्षिकाच फुल्ल टाईट, झिंगत झिंगत पोहोचली वर्गात; शिक्षण विभागात खळबळ) आई-वडिलांचे स्वप्न होते की आपल्या मुलाने स्वतःच्या मोठ्या गाडीत बसून आपल्या गावात यावे ही इच्छा पूर्ण करण्या करता आई वडिलांसाठी एक महागडी गाडी खरेदी केली. ती गाडी आई-वडिलांना भेट देऊन त्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमा प्रसंगी नामदार आशुतोष काळे यांनीही भेट देऊन संपूर्ण पुंगळ परिवाराचा सत्कार केला. यावेळी संपूर्ण पुंगळ कुटुंब आणि ग्रामस्थ उपस्थितीत होते.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या