अहमदनगर, 28 जानेवारी : वडिलांच्या दशक्रियेच्या आधीच मालमत्तेच्या वाटण्या झाल्या, असे अनेक ठिकाणी घडते. मात्र, नगर जिल्ह्यातील मॉडेल व्हिलेज गोरेगाव येथील पाठक कुटुंबातील गणेश पाठक व बापू पाठक या दोन उच्चशिक्षित युवकांनी आपल्या वडिलांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. वडिलांना स्वच्छतेची आवड होती म्हणून वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांनी आपल्या गावासाठी स्वच्छतेची गाडी देऊन एक चांगला संदेश दिला आहे.
सुखाच्या प्रसंगात अनेक लोक दान करतात. परंतु एखाद्या व्यक्तीला अशी अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्याची ही घटना दुर्मीळच. मध्यमवर्गीय कुटुंबातील सुखी जीवन जगत असताना इतकं दातृत्व ठेवणं आणि गावाप्रती इतकी आत्मीयता असणं की कौतुकाची बाब आहे. गावाला स्वच्छता रथ देऊन आज संपूर्ण गावातील कचरा संकलनाची समस्या पाठक बंधूंनी मिटवली.
चंदू अण्णा ही पाठक कुटुंबातील प्रमुख व्यक्ती होती. ज्यांनी गावातील सर्वच धार्मिक कार्ये पार पाडली. गावातील छोटे मोठे धार्मिक विधी करून चंदू अण्णा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. मुलं शिकली, नोकरीला लागली पण त्यांना गावाची ओढ, गावचा अभिमान, आणि गावाबद्दलची त्यांची आत्मीयता कमी पडू दिली नाही.
स्वच्छतेची आवड
उच्च विचार घेऊन गावासाठी आपणही काहीतरी देणं लागतो या भावनेतून आज पाठक बंधूंनी चंदू आण्णा यांनी गावातून दक्षिणेच्या स्वरूपात जमा केलेल्या छोट्या छोट्या रकमेच्या बदल्यात कितीतरी पटीने मोठी एक रकमी किंमत गावासाठी देऊन आज स्वच्छता रथ ग्रामपंचायतकडे अण्णांच्या स्मरणार्थ गावाला भेट दिला आहे,.चंदू अण्णा यांना स्वच्छता खूप आवडतं असे म्हणून आपलं गाव स्वच्छ सुंदर राहावं यासाठी ही रिक्षा वरदान ठरेल.
एक वर्षभर...! नवरदेवाची विचित्र अट, भरमंडपात स्वत:च्याच वडिलांना मारहाण
इलेक्ट्रिक रिक्षा
पारनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर माने यांच्या हस्ते हा स्वच्छता रथ मॉडेल व्हिलेज ग्रामपंचायतला सुपुर्द करण्यात आला. लोकनियुक्त सरपंच सुमन तांबे, उपसरपंच आण्णा पाटील नरसाळे व ग्रामपंचायत सदस्यांनी या अनोख्या भेटीचा स्वीकार केला. मॉडेल व्हिलेज गोरेगाव येथील पाठक बंधूंचा राज्याला पथदर्शी निर्णय आहे, समाज भान जपत हा निर्णय घेऊन एक नवा पायंडा या गावात पाडण्यात आला, या रिक्षासाठी दोन लाख पन्नास हजार रुपयांची कचरा वाहतूक इलेक्ट्रिक रिक्षा दशक्रिया विधीच्या दिवशी ग्रामपंचायतीला सुपुर्द केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Local18