Home /News /maharashtra /

Shirdivivah.com लॉन्च; जोडीदार शोधण्यापासून ते लग्नापर्यंत सर्व मोफत, शिर्डी साईबाबा विवाह संस्थानकडून वेबसाईट सुरू

Shirdivivah.com लॉन्च; जोडीदार शोधण्यापासून ते लग्नापर्यंत सर्व मोफत, शिर्डी साईबाबा विवाह संस्थानकडून वेबसाईट सुरू

जोडीदार शोधण्यापासून ते लग्नापर्यंत सर्व मोफत, शिर्डी साईबाबा विवाह संस्थानकडून Shirdivivah.com वेबसाईट लॉन्च

जोडीदार शोधण्यापासून ते लग्नापर्यंत सर्व मोफत, शिर्डी साईबाबा विवाह संस्थानकडून Shirdivivah.com वेबसाईट लॉन्च

shirdivivah.com website launched: ऑनलाईन माध्यमातून जोडीदार शोधण्यापासून ते लग्नापर्यंत सर्वकाही मोफत होणार आहे.

    शिर्डी, 2 जून : शिर्डीतील (Shirdi) साईबाबा विवाह सेवा संस्थानने ShirdiVivah.com ही वेबसाईट सुरू केली आहे. नुकतेच या मेट्रिमोनियल वेबसाईटचं लॉन्चिंग झालं. या वेबसाईटच्या माध्यमातून तरुण-तरुणी आपल्या आवडीचा जोडीदार ऑनलाईन शोधू शकणार आहेत आणि या जोडीदारासोबत विवाह सुद्धा संस्थानकडून मोफत लावण्यात येणार आहे. आपल्या मुला-मुलीसाठी उत्तम जोडीदार शोधण्या बरोबरच शिर्डीत सामुदायिक विवाह सोहळ्यात मोफत लग्न लावता येणार आहे. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीतून मोफत सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे. ही वेबसाईट पूर्णपणे मोफत असणार आहे. त्यासाठी तरुण-तरुणींना कुठलंही शुल्क द्यावे लागणार नाहीये. वाचा : मंदिरामध्ये जाऊन घंटा का वाजवली जाते? जाणून घ्या या मागचं विज्ञान! जोडीदार शोधण्यापासून ते लग्नापर्यंत सर्वकाही मोफत होणार आहे. त्यामुळे विवाह करण्याच्या तयारीत असलेल्या तरुण-तरुणींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. या वेबसाईटवर कुठल्याही जाती किंवा धर्माचे इच्छुक तरुण-तरुणी विवाहासाठी आपला अर्ज करुन नोंदणी करु शकतात. मनासारखा जोडीदार मिळावा यासाटी अनेक तरुण-तरुणी आणि त्यांचे पालक शिर्डीत साई बाबांच्या चरणी प्रार्थना करत असतात. हेच लक्षात घेऊन श्री साईबाबा विवाह सेवा संस्थाने मेट्रिमोनियल वेबसाईट लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेबसाईटवर एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांच्या प्रोफाईलची एक प्रिंट काढण्यात येते. त्यानंतर त्यांची प्रोफाईल सक्रिय केली जाते. मग इतर तरुण-तरुणी किंवा त्यांचे पालक इतरांसोबत संपर्क करु शकतात. वाचा : जून महिन्यातील सगळ्या शुभ मुहूर्तांची यादी येथे पाहा; लग्नासाठी 12 दिवस आहेत मुहूर्त पेड आणि पर्सनलाईज सेवाही नोंदणीसाठी तीन वेगवेगळ्या पॅकेजची सुविधा देण्यात आली आहे. ज्यामध्ये मोफत, सशुल्क आणि व्हीआयपी अशा सुविधांचा समावेश आहे. सशुल्क आणि व्हीआयपी श्रेणींसाठी वार्षिक पॅकेजची किंमत अनुक्रमे 5,100 रुपये आणि 11,000 रुपये इतकी आहे. सशुल्क नोंदणीत तुम्ही थेट संपर्क पाहू शकणार आहात. तर व्हीआयपी श्रेणीत तुम्हाला सर्वांचे प्रोफाईल स्पॉटलाईट देखील तपासून मिळणार आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Marriage, Shirdi

    पुढील बातम्या