मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुख्यमंत्र्यांनाही 12 कोटींच्या रेड्याच आकर्षण; कार्यक्रमानंतर थेट रेडा पाहायला; पाहा Video

मुख्यमंत्र्यांनाही 12 कोटींच्या रेड्याच आकर्षण; कार्यक्रमानंतर थेट रेडा पाहायला; पाहा Video

मुख्यमंत्र्यांनाही 12 कोटींच्या रेड्याच आकर्षण

मुख्यमंत्र्यांनाही 12 कोटींच्या रेड्याच आकर्षण

देशातील सर्वात मोठे महापशुधन एक्सपो 2023 चे शिर्डी येथे आयोजन करण्यात आले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

शिर्डी, 26 मार्च : शिर्डीत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तीन दिवसीय महा पशुधन एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यासह देशभरातून वेगवेगळ्या जातीचे पशुधन या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या कार्यक्रमाला हजेरी लावली. हरियाणा राज्यातील मुऱ्हा जातीचा रेडा या एक्स्पोचं विशेष आकर्षक ठरलाय. तब्बल 12 कोटी रूपये किंमत असलेल्या या रेड्याचं आकर्षण खुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निर्माण झालं. आपल्या भाषणातूनही त्यांना या रेड्याचा उल्लेख केला. कार्यक्रम आटोपल्यानंतर रेडा पाहण्यासाठी मुख्यमंत्री खास दालनात पोहचले.

पंचक्रोशितही रेड्याचीच चर्चा

12 कोटी रुपये किंमतीचा रेडा या महा पशुधन एक्स्पोत आल्याचे परिसरातील शेतकऱ्यांना माहित झाल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे. अनेकांना या रेड्याची किंमत ऐकून विश्वासच बसत नाहीये. याबाबत रेड्याचे मालक गुर्तियार सिंग यांना विचारले असता त्यांनी सांगितले की,या रेड्याच्या वीर्यातून वर्षाला 75 ते 80 लाख रुपये उत्पन्न मिळतं.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

कालपर्यंत अधिवेशन सुरू होते. त्यामुळे उद्घाटनाला येता आलं नाही. राधाकृष्ण विखे पाटलांचा आग्रह असल्याने समारोपाला आलो. शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळेच या कार्यक्रमासाठी आलो. आमचा कारभार शेतकरी हितासाठीच आहे. पशुधन एक्स्पो शेतकऱ्यांसाठी मोठं व्यासपीठ आहे. यातून खुप काही नवीन शिकायला मिळत आहे. सहकार चळवळीचा पाया अहमदनगर जिल्ह्यात रोवला गेला. त्या भुमीत पशुधन एक्स्पो पार पडला याचा आनंद आहे. लाखो शेतकऱ्यांना एक्स्पोचा फायदा होणार आहे.

विखे पाटील यांच्या नियोजनाचे हे यश आहे. लम्पी आजारावर आपण तातडीने लस दिली. लम्पीमुक्त पशुधन करण्याचा विडा उचलला. विखे पाटील यांनी मोठा पाठपुरावा केला. नवनवीन जाती प्रजातींची माहिती शेतकऱ्यांना व्हायला हवी. आपण कधीही न पाहीलेल्या जाती प्रजाती या ठिकाणी बघायला मिळाल्या. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने पशुसंवर्धन केले तर त्यांना फायदा होत आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. नवनवीन काहीतरी आत्मसात करायला हवं. आपल्याला जे येतं ते इतरांना दिलं पाहीजे. यामुळे समाज सुजलाम सुफलाम होतो. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. तुम्हाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

First published:
top videos

    Tags: Eknath Shinde