Home /News /maharashtra /

शिंदे गटाकडून ठाकरेंचं कौतुक! मुर्मू यांना पाठींबा दिल्याने 'तो' आरोप पुसल्याचं आ. सरवणकरांचे मत

शिंदे गटाकडून ठाकरेंचं कौतुक! मुर्मू यांना पाठींबा दिल्याने 'तो' आरोप पुसल्याचं आ. सरवणकरांचे मत

अडीच वर्षात आम्ही हिंदूत्वाची चेष्ठा केली असा आरोप आमच्यावर होत होता, त्याला मुर्मू यांना पाठींबा देवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रामाणिक उत्तर दिल्याचं शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिर्डीत म्हटलंय.

  सुनिल दवंगे, प्रतिनिधी शिर्डी, 12 जुलै : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनएडीएच्या द्रौपदी मुर्मू (draupadi murmu) यांना शिवसेनेनं पाठिंबा द्यावं अशी शिवसेना खासदारांनी गळ घातल्यानं आज अखेर उद्धव ठाकरे यांनी मुर्म यांना पाठींबा दर्शवला आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटात या निवडणुकीच्या निमित्ताने मनोमिलन होण्याची चर्चा रंगली असली तरी मनोमिलनांची आवश्यक्ता नसून शिवसेना आणि भाजप एकाच विचारधारेचे पक्ष आहेत. अडीच वर्षात आम्ही हिंदूत्वाची चेष्ठा केली असा आरोप आमच्यावर होत होता, त्याला मुर्मू यांना पाठींबा देवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रामाणिक उत्तर दिल्याचं शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिर्डीत म्हटलंय. आमदार सरवरणकर गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आले होते. साईबाबांच्या धूपारतीनंतर माध्यमांशी बोलतांना सरवणकर यांनी म्हटले की, गुरपौर्णिमा म्हणजे गुरु पूजनाचा योग. यादिवशी आम्ही शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांचे पूजन करत असत. मात्र, आता ते नाहीत त्यामुळे साईबाबाच आमचे गुरु आहेत. यानिमित्तानं बाबांच्या चरणी येवून आशीर्वाद घेतले. शिवसेना-भाजपची युती अभेद राहावी, तसेच महाराष्ट्राल वैभव प्राप्त व्हावं अशी प्रार्थना केल्याचं सरवणकर यांनी यावेळी सांगीतले. विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युती होती. लोकांनी हिंदूत्वाच्या मुद्द्यावर आम्हाला मतं दिली. मात्र, राष्ट्रवादी काँगेस आणि काँगेस सोबत युती केल्यानं आम्ही हिदूत्वाची चेष्ठा केल्याची टीका आमच्यावर सातत्यानं होत होती. मात्र, आता भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा देण्याच जाहीर केल्यानं ह्या सर्व टिकांना उत्तर मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांनी पाठींबा दर्शवनं ही शिंदे गटासाठी आनंदाची घटना असून मनोमिलन होण्याची गरज नाही. कारण शिवसेना आणि भाजप एकाच विचाराचे पक्ष आहेत. तेव्हा ही युती अभेद्य राहावी.

  मातोश्रीबाहेर मृत्युमुखी पडलेल्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री शिंदेंकडून मदत; ठाकरेंच दुर्लक्ष?

  मागील तीन-चार दिवसापूर्वी सरवणकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हा शिंदे गट मनसेत सहभागी होणार अशाही चर्चा सुरु झाल्या होत्या, यावर बोलताना आमदार सरवणकर यांनी म्हटलंय की, आपण राज ठाकरे यांच्या शेजारीच राहत असल्यानं भेटीसाठी गेलो होतो. ठाकरे कुटूंबियातील प्रत्येक सदस्याबद्दल नितांत आदर आहे. आणि या आदरापोटीच आपण राज ठाकरे यांची भेट घेतली होती. शिंदे मातोश्रीवर जायचं म्हटलं तर.. शिवसेनेनं बंडखोर आमदारांविरोधात अपात्रेतेची नोटीस बजावली होती. एकीकडे राजकीय संघर्षाला धार आली असतानाचं दुसरीकडे शिवसेनेतील दोन्ही गटाचं मनोमिलन होण्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. यावर आमदार सरवणकर यांनी म्हटलंय की, मातोश्रीवरुन आमचे नेते एकनाथ शिंदे यांना बोलवण आलं आणि शिंदे मातोश्रीवर जायचं म्हटलं तर कोणीच आमदार विरोध करणार नाही किंवा आडकाठी घालणार नाही. असं देखील आमदार सरवणकर यांनी साई दर्शनानंतर शिर्डीत म्हटलं आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Shivsena, Uddhav thackeray

  पुढील बातम्या