अहमदनगर, 25 जानेवारी : महिलांना स्वत:चं आयुष्य जगण्यासाठी अनेक संकटाचा सामना करावा लागतो. घरची आर्थिक परिस्थिती मजबूत नसेल तर महिलांना स्वत:चा पायावर उभा राहावे लागते. अशा महिलांसाठी शिवणकाम व्यवसाय फायद्याचा ठरतो. अनेक महिला शिवणकामातून आत्मनिर्भर झाल्याचे उदाहरणे आहेत. नगर जिल्ह्यातील मनीषा शिंदे यांनी आपला शिवणकाम व्यवसाय उभारला असून त्या इतरांना देखील प्रशिक्षण देण्याचे काम करतात.
ग्रामीण भागातील अनेक महिलांमध्ये अनेक कलागुण असतात, मात्र योग्य व्यासपीठ न मिळाल्यामुळे ते दबून राहतात, मनीषा शिंदे ह्या आधी शिवणकाम स्वतः शिकल्या नंतर अनेकांना शिकवू लागल्या, यातून अनेक महिलांना त्यांनी आत्मनिर्भर बनवले आहे. ग्रामीण भागात मुख्यत: शेतात जाऊन मजुरी करणे हे पारंपरिक काम असते. मात्र घर बसल्या हाताला काही तरी काम असावं. म्हणून अनेक महिला शिवण क्लास करून शिलाई काम शिकतात. स्वतः टेलर होऊन आर्थिक पाया मजबूत करत आहेत. ग्रामीण भागात महिलांसाठी क्लास घेणाऱ्या मनीषा विजय शिंदे यांनी मुलींना शिवणकाम शिकवले.
गावातील मुलींसाठी क्लास
मनीषा यांनी क्लास सुरू केल्यामुळे गावातील महिलांना क्लास करण्यासाठी बाहेर कुठे जाण्याची गरज पडली नाही. त्यांना ही सुविधा गावात उपलब्ध केली आहे. त्यामुळे महिला जास्त शिकल्या आणि आजूबाजूच्या गावचे काम ही आपल्या गावात करू लागल्या.
क्लासचे सर्टिफिकेट
मनीषा यांचे शिक्षण बी ए झालं असून त्यांनी फॅशन डिझाईनचे सर्व कोर्स केले. सरकारच्या अनेक योजनाचा माध्यमातून त्यांनी महिलांना स्वावलंबी बनवले. सायली शिवण क्लासमध्ये दोन महिन्यांचा हा कोर्स झाल्यानंतर महिलांना सर्टिफिकेट दिलं जातं.
कोरोनामुळे झालं होत्याचं नव्हतं तरीही सोडली नाही जिद्द, वर्षभरात झाले करोडपती!
कुटुंबाला हातभार
ब्लॉउज, ड्रेस यातील नवं नवीन डिझाईन ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी महिलांना शिकवल्या.आज अनेक महिला स्वतः चे तर काम करत आहेतच मात्र इतरांचे काम करून देत आहेत. महाविद्यालयीन तरुणी आपल्या मोकळ्या वेळेत शिवण काम करून कुटुंबाला हातभार लावत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Local18