Home /News /maharashtra /

कर्जतमधील त्या कामाला स्थगिती दिल्याने रोहीत पवार नाराज; ट्विट करत मुख्यमंत्र्यांना केली ही विनंती

कर्जतमधील त्या कामाला स्थगिती दिल्याने रोहीत पवार नाराज; ट्विट करत मुख्यमंत्र्यांना केली ही विनंती

नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार (Rohit Pawar) यांच्या कर्जतला दिवाणी न्यायालय मंजूर करुन आणण्याच्या निर्णयालाही शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. यावर आता रोहीत पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    अहमदनगर 18 जुलै : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी नवं सरकार स्थापन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींना (Maharashtra Political Updates) प्रचंड वेग आला आहे. सत्तेत येताच शिंदे आणि फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्यास सुरुवात केली आहे. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार (Rohit Pawar) यांच्या कर्जतला दिवाणी न्यायालय मंजूर करुन आणण्याच्या निर्णयालाही शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. यावर आता रोहीत पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोठी बातमी, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लांबण्याची शक्यता रोहीत पवार यांनी टि्वट करत शिंदे सरकारने मविआचे निर्णय रद्द केल्याने सडकून टिका केली आहे. रोहीत पवार यांनी ट्विटमध्ये लिहिलं, 'माझ्या मतदारसंघातील पक्षकारांची 'तारीख पे तारीख' या त्रासातून सुटका व्हावी आणि वकीलांचीही सोय व्हावी म्हणून गेली दोन-अडीच वर्षे पाठपुरावा करुन मविआ सरकार असताना मी कर्जतला दिवाणी न्यायालय मंजूर करुन आणलं. पण या सरकारने सत्तेत येताच या निर्णयाला स्थगिती दिली.' पुढे ते म्हणाले, 'कदाचित, राज्य पातळीवरील मोठ्या निर्णयांना स्थगिती देताना तालुका पातळीवरील दिवाणी न्यायालयासारख्या छोट्या निर्णयालाही स्थगिती देण्याचा निर्णय अनावधानाने झाला असावा. त्यामुळं माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, याबाबत आपण व्यक्तिशः लक्ष घालून या निर्णयावरील स्थगिती उठवावी.' 'न्यायालयाने सक्तीची नसबंदी केल्यानेच 'वासू-सपना' सरकारवर..'; शिवसेनेचा शिंदे-फडणवीसांना टोला रोहीत पवार यांनी पुढे लिहिलं, की 'केलेल्या कामाचं श्रेय घ्यायला हरकत नाही, पण न केलेल्या कामाचं श्रेय घेणारे माझ्या मतदारसंघात अनेकजण आहेत. कदाचित मी प्रयत्न करून मंजूर करून आणलेल्या दिवाणी न्यायालयाच्या बाबतीतही श्रेय घेण्यासाठी असे लोक पुढं यायला कमी करणार नाहीत.'
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde, Rohit pawar

    पुढील बातम्या