मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Video : नगरमध्ये आहे टाटांचा जबरा फॅन, प्रेमापोटी गाडीवरही प्रिंट केला फोटो

Video : नगरमध्ये आहे टाटांचा जबरा फॅन, प्रेमापोटी गाडीवरही प्रिंट केला फोटो

X
एका

एका फॅनने असे काही केले आहे की त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. पठ्ठ्याने टाटांबद्दलच्या प्रेमापोटी जीवनच टाटामय केलं आहे.

एका फॅनने असे काही केले आहे की त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. पठ्ठ्याने टाटांबद्दलच्या प्रेमापोटी जीवनच टाटामय केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ahmadnagar (Ahmednagar), India

    अहमदनगर, 7 नोव्हेंबर : सोशल मिडियाच्या जमान्यात प्रत्येकजण कोणाचा तरी फॅन आहे. मग कोणी सिनेमातील हिरोचा तर कोणी खेळाडूंना फॅन आहे. फॅन आपल्या हिरोसाठी काहीही करण्यासाठी तयार होतात. नगरमधील अशाच एका फॅनने असे काही केले आहे की त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. पठ्ठ्याने टाटांबद्दलच्या प्रेमापोटी जीवनच टाटामय केलं आहे. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत तो सर्व प्रॉडक्ट टाटांचेच वापरतो. 

    नगरच्या सोलापूर रोड नजीक राहणारा रवी पाटोळे टाटांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन वाटचाल करत आहे.आयुष्यात संघर्ष करत आधी फोटोग्राफी केली. त्यानंतर दुसऱ्याकडे किती दिवस काम करणारा म्हणून स्वत:चा फोटो लॅब सुरू केला. रवीची सकाळ 'टाटा टी'ने होते. त्यानंतर नाष्ट्यासाठी देखील 'देश का नमक, टाटा नमक' वापरतो. एवढंच नाही तर रवीची गाडी देखील टाटा कंपनीच असून त्यावर टाटांचा फोटो देखील प्रिंट करण्यात आला आहे. रतन टाटा The Pride Of India हे वाक्य जगातल्या 57 भाषेत प्रिंट करून रवीने गाडीवर चिकटवले आहे.

    झोपडी ते ताज पॅलेस : 'मला पैसे नकोत तर...' कोळीवाड्यातील तरूणाने जिंकलं टाटांचं मन, Video

    टाटांना एकदा भेटायची इच्छा

    रतन टाटा यांच औद्योगिक जडणघडणीत जितका लाखमोलाचा वाटा आहे. तितकाच मोठा वाटा हा सामाजिक कार्यात देखील आहे. जेव्हा कधी देशावरती संकट येतात तेव्हा रतन टाटा हे देशासोबत भक्कमपणे उभे असतात. त्यामुळे त्यांचे करोडो चाहते आहेत. पण रवी पाटोळे हा एक वेगळाच चाहता आहे. रवी टाटांचे सर्व प्रॉडक्ट वापरतो त्यामुळे रवीची सर्वत्र चर्चा होत आहे. 2006 पासून रवी टाटांचे फॅन झाला आहे. आयुष्यात रतन टाटा यांना एकदा भेटायची इच्छा रवीची आहे.  

    Video : पारध्याच्या पोरीनं नाव कमावलं, ‘रेखा’ची इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड

    कुटुंबाची साथ 

    आमचे लग्न 2007 मध्ये जमले. तेव्हा मला त्यांनी टाटाचा मोबाईल दिला. मी सासरी आले तेव्हा घरात बऱ्याच गोष्टी टाटा कंपनीच्या आढळल्या. मीठ, चहा पावडर, डिश या सगळ्या गोष्टी टाटा कंपनीच्या आहेत. त्यांच्या आवडीला आणि टाटांबद्दलच्या प्रेमाला आम्ही सर्व कुटुंब देखील साथ देतो असे रवीच्या मिसेस सांगतात. 

    First published:
    top videos

      Tags: Ahmednagar, Ratan tata