मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'जो हमसे टकराएगा...' म्हणत विखेंनी थोरातांना त्यांच्याच होमग्राऊंडमध्ये डिवचले, VIDEO

'जो हमसे टकराएगा...' म्हणत विखेंनी थोरातांना त्यांच्याच होमग्राऊंडमध्ये डिवचले, VIDEO

माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयासमोरच विखे पाटील यांचा भव्य सत्कार होत आहे

माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयासमोरच विखे पाटील यांचा भव्य सत्कार होत आहे

माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयासमोरच विखे पाटील यांचा भव्य सत्कार होत आहे

संगमनेर, 28 ऑगस्ट : अहमदनगरच्या राजकारणामध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातला वाद अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. राज्यात आता सत्ता पालट झाल्यानंतर विखे पाटील (radhakrishna vikhe patil) महसूल मंत्री झाले आहे. आज विखेंनी थोरातांच्या मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करत 'जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जायेंगा' असा इशाराच दिला आहे. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार सोहळा संगमनेरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे विखे समर्थकांनी विखे पाटील यांची रॅली काढत थोरातांच्या शहरात शक्तिप्रदर्शन केलं आहे. माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयासमोरच हा भव्य सत्कार होत आहे. क्रेनच्या सहाय्याने भव्य पुष्पहार घालून विखेंचं जंगी स्वागत करण्यात आलंय. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली आहे. या मिरवणुकीमध्ये विखे पाटील यांनीही ओपन कारमधून बाहेर येऊन जोरदार घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने त्यांनी घोषणा दिल्या. तसंच भारतीय जनता पार्टीचा विजय असो, अशा घोषणा ही दिल्यात. त्यानंतर 'जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा' असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकाप्रकारे बाळासाहेब थोरात यांना इशाराच दिला आहे. (शिवसेना बांधणीसाठी उद्धव ठाकरेंनी केले पक्षात तीन मोठे फेरबदल यांच्यावर जबाबदारी) महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल खाते देण्यात आले होते. मात्र, शिंदे गटाने बंडखोरी करून सरकार पाडले. त्यानंतर विखे पाटील यांच्याकडे महसूल खाते देण्यात आले. एवढंच नाहीतर शपथविधी सोहळ्यात विखे पाटील यांनाच पहिला मान देण्यात आला होता. त्यामुळे नगरमध्ये आगामी काळात थोरात आणि विखे यांच्यात वाद पेटणार हे आता जवळपास निश्चित आहे.
First published:

पुढील बातम्या