मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Radhakrishna Vikhe Patil : अजित पवारांचे मानसिक संतुलन बिघडले, विखे पाटलांची जहरी टीका

Radhakrishna Vikhe Patil : अजित पवारांचे मानसिक संतुलन बिघडले, विखे पाटलांची जहरी टीका

विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याने मागची दोन आठवडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला होता.

विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याने मागची दोन आठवडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला होता.

विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याने मागची दोन आठवडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ahmadnagar, India

नगर, 01 जानेवारी : मागची दोन आठवडे हिवाळी अधिवेशन असल्याने राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याने मागची दोन आठवडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला होता. दरम्यान राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दरम्यान पवारांनी माफी मागावी असे ही ते म्हणाले.

विखे पाटील म्हणाले की, विरोधकांची मानसिक कोंडी झाली आहे. महाविकास आघाडीचे नेतेच अधिवेशनात परस्पर विरोधी विधान करत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान अजीत पवार हे बेताल विधान करत आहेत. हिंदु धर्म, स्वधर्म यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलं आहे. अजित पवारांना हे कळायला हव की ते धर्मवीर आहेत. अजित पवार यांनी वक्तव्याबद्दल माफी मागावी, आत्मक्लेश करावा, अशी मागणी भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

हे ही वाचा : उद्धवजींबद्दल आदरच पण जेव्हा घर पेटतं तेव्हा.., नेमकं काय म्हणाले दीपक केसरकर?

मधल्या काळात शरद पवार यांनी देखील आक्षपार्ह विधान केलं होते. मविआच्या नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने अशी वक्तव्य करत आहेत. मविआ सरकार हे वसुली सरकार होते. जे वक्तव्य अजित पवारांनी केलं. विरोधकांनी स्वत:चं हसू करवून घेतलंय. काळाच्या ओघात घटक पक्षामधील एकोपा राहिला नाही. आघाडी देखील राहील की नाही याबाबत शंका विखे पाटलांनी व्यक्त केली.

अब्दुल सत्तारांवर कारवाई होण्याची शक्यता

अब्दुल सत्तार यांच्यावर सिल्लोडमधील जमिनी लाटल्याचा आरोप करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांच्यासह 5 शेतकऱ्यांची 1400 पानी तक्रार सीबीआयकडे केली होती.

या तक्रारीत 200 शेतकऱ्यांच्या जमिनीचे पुरावे दिल्याचा दावा केला आहे. तसंच 28 मुद्द्यांवर सत्तार यांच्या संपत्ती चौकशीची मागणी केली आहे.

हे ही वाचा : एकनाथ खडसेंच्या सुनबाई खासदार रक्षा सासऱ्याच्या मदतीला; गिरिष महाजन म्हणतात..

कथीत गायरान घोटाळा, टीईटी घोटाळा, सिल्लोड महोत्सव यानंतर शेतकरी जमीन घोटाळ्याचा अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप झाला आहे. आता सिल्लोडमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे सत्तार यांच्याविरोधात सीबीआयमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसंच ईडीकडेही या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे सत्तारांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.

First published:
top videos

    Tags: Ajit pawar, BJP, NCP, Radha krishna vikhe patil