Home /News /maharashtra /

'शिवसेनेची अवस्थाही काँग्रेसप्रमाणेच होणार'; आता खासदारांच्या बंडाबाबत राधाकृष्ण विखे पाटलांचा मोठा दावा

'शिवसेनेची अवस्थाही काँग्रेसप्रमाणेच होणार'; आता खासदारांच्या बंडाबाबत राधाकृष्ण विखे पाटलांचा मोठा दावा

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंचं टेन्शन आणखी वाढवणारं वक्तव्य केलं आहे. शिवसेनेची अवस्था काँग्रेसपेक्षा वेगळी होईल असं वाटत नाही असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

अहमदनगर 07 जुलै : उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले १५ पैकी अनेक आमदार तसेच १२ हून अधिक खासदारसुद्धा बाहेर पडतील, असा दावा भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे (Radhakrishna Vikhe Patil). तर भरकटलेलं जहाज आणि बेताल वक्तव्य करणारे प्रवक्ते एवढीच शिवसेना आता शिल्लक राहिली असल्याचा टोलादेखील विखे पाटलांनी संजय राऊतांचं नाव न घेता लगावला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील ४० आमदार त्यांच्या गटात सामील झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत केवळ १५ आमदार असून अनेक खासदारदेखील शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शिंदे सरकार येताच बंडखोर आमदाराचे काम झालं, सरनाईकांच्या प्रकल्पाला 150 कोटींची मंजुरी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंचं टेन्शन आणखी वाढवणारं वक्तव्य केलं आहे. शिवसेनेची अवस्था काँग्रेसपेक्षा वेगळी होईल असं वाटत नाही असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे. शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पुढील काही महिन्यातच मध्यावधी निवडणुका लागतील असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी केला आहे. विखे पाटलांनी मात्र हा दावा फेटाळून लावत मध्यावधी निवडणुकीची विधाने नैराश्यातून येत असल्याचं म्हटलं आहे. मोठी बातमी : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम ठरला! राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं बोलले जात आहे. या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी राज्य काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. यावरून विखे पाटलांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसमध्ये आता कोणावर कारवाई करणार? थोडेफार शिल्लक आहेत ते तरी पक्षात राहिले पाहिजे, असा टोला विखे पाटलांनी लगावला आहे. आता विचाराचं आणि विकासाचं सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार अडीच वर्षात जनतेचा विश्वास संपादन करणार आहे. आघाडीने अधोगतीला नेलेलं राज्य आता विकासाकडे जाणार यात शंका नाही, असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केला आहे.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Radha krishna vikhe patil

पुढील बातम्या