साहेबराव कोकणे, प्रतिनिधी
अहमदनगर, 22 मे : सध्या लग्नसराईचा सिझन सुरू असून सगळीकडे लग्नाचा धुमधडाका पाहायला मिळत आहे. लग्न म्हटलं की रुसवेफुगवे आलेच. लग्नात प्रत्येकजण आपापले हट्ट पुरवून घेण्यामागे लागलेला दिसतो. या गोष्टी तेव्हढ्यापुरत्या मर्यादीत असतात. दरम्यान, पार्थडी येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे लग्नासाठी आलेल्या दोन गटांमध्ये वाद झाल्याने यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर एक जखमी झाली आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
काय आहे प्रकरण?
पाथर्डी तालुक्यातील कीर्तनेवाडी येथे लग्न समारंभासाठी आलेल्या कुटुंबाचा बडेवाडी येथे दहाव्याच्या कार्यक्रमात शहादेव धायतडक आणि बाळासाहेब शिरसाट यांच्यात किरकोळ वाद झाला होता. याचा राग आल्याने कीर्तनेवाडी येथे सुरू असलेल्या लग्न समारंभामध्ये शिरसाट आणि कीर्तने कुटुंबात वाद झाला हे भांडण सुरू असताना सुशीला कीर्तने या भांडण सोडवण्यासाठी गेले असता शुभम धायतडक याने त्यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही मारहाण इतकी गंभीर होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात असून पोलिसांनी मयत महिलेचा मेहुणा व त्याचा मुलगा असे दोघांना ताब्यात घेतले आहे.
आनंदात केलेला गोळीबार दुःखात बदलला
लग्नाच्या मंडपातील एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारची राजधानी पाटणाला लागून असलेल्या दानापूर शाहपूरमध्ये काल रात्री लग्न समारंभात जोरदार गोळीबार झाला. ज्यात गोळी लागल्याने सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. त्याचवेळी यामध्ये पाच जण जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे प्रकरण दियारा येथील गंगहरा पंचायतीच्या फुटाणी मार्केटशी संबंधित आहे. शिवानी असं मृत तरुणीचं नाव आहे. तिचे वडील उमेश राय यांच्या जबानीवरून स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर लोकांनी बुधन राय या शूटरला पकडलं. तर दुसरा आरोपी अनिल साओ घटनास्थळावरून पळून गेला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.