मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'....तर पवारांची औलाद नाही', अजितदादांच्या शब्दांनी शिर्डीकर भारावले!

'....तर पवारांची औलाद नाही', अजितदादांच्या शब्दांनी शिर्डीकर भारावले!

 
'कधी कधी काही बहाद्दर असे निघतात, मीडियांना काही तरी सांगतात, पत्रक काढतात, पत्रकारांकडे काही बोलतात. पण...

'कधी कधी काही बहाद्दर असे निघतात, मीडियांना काही तरी सांगतात, पत्रक काढतात, पत्रकारांकडे काही बोलतात. पण...

'कधी कधी काही बहाद्दर असे निघतात, मीडियांना काही तरी सांगतात, पत्रक काढतात, पत्रकारांकडे काही बोलतात. पण...

  • Published by:  sachin Salve

शिर्डी, 06 एप्रिल : 'आम्ही माणसंच आहोत, काही साधूसंत नाही. तरीही आम्ही कामं करतो आणि त्यावरून मतं मागतो. जी आश्वासनं दिलं होती ती पूर्ण करून दाखवणारच. जर नाही केली तर पवारांची औलाद सांगणार नाही', असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरकरांना जाहीर सभेत आश्वसत केलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत शिर्डीमध्ये नव्या पोलीस स्टेशनचं उद्घाटन पार पडलं.

'गृहमंत्री आणि आम्ही हा निर्णय घेतला आहे की, राज्यातील पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट आहे. चांगले पोलीस स्टेशन नाही. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना चांगली सुविधा मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहोत. यंदाच्या वर्षी सगळ्या कामासाठी बांधकामासाठी 807 कोटींची तरतूद केली आहे. हा निधी कमी असला तरी आगामी अधिवेशनात 100 टक्के निधी वाढवून देईल, असं आश्वासन अजित पवारांनी केली.

(साबण, दूध, बिस्किटं, कॉफीनंतर आता डाळीचे भावही कडाडले, तब्बल 16 टक्क्यांची वाढ)

'कधी कधी काही बहाद्दर असे निघतात, मीडियांना काही तरी सांगतात, पत्रक काढतात, पत्रकारांकडे काही बोलतात. पण तुम्हाला काही बोलायचे असेल तर तुम्हाला अधिकार कुणी दिला, काही बोलायचे असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगा, गृहमंत्र्यांना सांगा, पालकमंत्र्यांना सांगा किंवा खासदार आणि आमदारांना सांगा. आतापर्यंत अधिकाऱ्यांनी काम करत असताना पोलीस दलाला, गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना मान शरमेनं खाली घालावी लागू नये, असं काम करू नका, कुणाच्याही राजकीय दबावाला बळी पडून काम करू नका, अशी तंबीही अजित पवारांनी पोलिसांना भरली.

(IPL 2022 : अंपायरची मोठी चूक RCB ला पडली महागात, एका बॉलमुळे गेल्या 3 सिक्स!)

तुम्ही आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं. त्यामुळे आम्हीी कामं करतो. त्यामुळे पुन्हा तुमच्याकडे मतांची अपेक्षा ठेवतो.  आम्ही माणसंच आहोत, काही साधूसंत नाही. तरीही आम्ही कामं करतो आणि त्यावरून मतं मागतो. तुमच्या मतदारसंघात लाखांच्या मताधिक्यानं निवडून येत असतो., पण यंदा काळे यांना कमी मतं मिळाली. पुढील वेळा ती वाढली पाहिजे. पुढे घोडामैदान जवळच आहे. मी शब्दाला पक्का आहे,  जी आश्वासनं दिलं होती ती पूर्ण करून दाखवणारच. जर नाही केली तर पवारांची औलाद सांगणार नाही, असंही पवारांनी ठणकावून सांगितलं.

First published: