मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत तर शिवसेना म्हणजे मूक बायको' BJP खासदाराची बोचरी टीका

'राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत तर शिवसेना म्हणजे मूक बायको' BJP खासदाराची बोचरी टीका

फाईल फोटो

फाईल फोटो

Ahmednagar News: विरोधीपक्ष महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतानाच भाजपचे खासदार सुजय विखे यांची महाविकास आघाडी सरकारवर बोचरी टीका केली आहे. त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेची तुलना नवरा-बायकोशी केली आहे.

  • Published by:  News18 Desk

अहमदनगर, 27 मार्च: मागील काही दिवसांपासून ईडीने (ED) महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) अनेक नेत्यांवर कारवाई केली आहे. बेनामी संपत्ती आणि इतर भ्रष्टाचार प्रकरणात ईडीने त्यांची उचलबांगडी केली आहे. महाराष्ट्रात ईडीच्या वाढत्या कारवायांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. दुसरीकडे विरोधीपक्ष महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. अशात भाजपचे खासदार सुजय विखे (BJP MP Sujay Vikhe) यांची महाविकास आघाडी सरकारवर बोचरी टीका केली आहे.

त्यांनी अहमदनगर याठिकाणी पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, 'महाविकास आघाडीचा संसार हा राष्ट्रवादी-शिवसेनेच्या लग्नाप्रमाणे आहे. यामध्ये राष्ट्रवादी ही नवऱ्याच्या भूमिकेत आहे. तर शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत (NCP is husband and shivsena is silent wife) आहे. तर काँग्रेस हे लग्नात आलेले बिनबुलाए वऱ्हाडी आहेत. त्यांना कितीही बोललं तरी ते जेवणाचं ताट सोडायला तयार नाहीत, अशी बोचरी टीका भाजप खासदार सुजय विखे यांनी केली आहे.

हेही वाचा- 'एकनाथ खडसे टाकताय महाविकास आघाडीत मिठाचा खडा', शिवसेनेच्या आमदाराचा घणाघात

महाराष्ट्रातील ईडीच्या कारवायांबद्दल बोलताना विखे म्हणाले की, 'आम्ही तर त्यांना चोऱ्या करायला सांगितलं नव्हतं. ज्यांनी चोऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला त्यांच्यावर कारवाई तर होणारच. देशाचे पंतप्रधान म्हणतात की 'मैं चौकीदार हूं' मग देशाचं संरक्षण करणं त्यांचं कर्तव्य आहे. जर तुम्ही भ्रष्टाचार केला नसेल तर पुरावे द्यावे, टीव्हीवर येऊन बोलण्याची गरज का आहे?  असा सवालही सुजय विखे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

हेही वाचा- तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे, नाहीतर काय मिळणार घंटा, अजितदादांनी तुफान फटकेबाजी, VIDEO

किरीट सोमय्या यांना काल पोलिसांनी दिलेल्या वागणुकीबद्दल बोलताना विखे म्हणाले की, केंद्रीय मंत्र्यांना अटक करताना राज्य सरकारने कोणताही विचार केला नाही. आम्ही केवळ दोन मंत्री उचलले तर तुमची एवढी तळतळ होतीये. अजून तर खूप मोठी लिस्ट आहे, असंही विखे म्हणाले. याशिवाय केंद्र शासनाच्या निधीतून अहमदनगर जिल्ह्यात जे रस्त्याचे काम झालं. त्याचं श्रेय राष्ट्रवादीचे काही आमदार घेत आहेत. त्यांनी जरा नैतिकता बाळगायला हवी असं म्हणत त्यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमदार रोहित पवार त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

First published:

Tags: Ahmednagar, BJP, NCP, Shivsena