Home /News /maharashtra /

शिंदे गट की उद्धव ठाकरे? याबद्दल द्विधा मनस्थितीत होतो, मात्र आता....; शंकरराव गडाखांची मोठी घोषणा

शिंदे गट की उद्धव ठाकरे? याबद्दल द्विधा मनस्थितीत होतो, मात्र आता....; शंकरराव गडाखांची मोठी घोषणा

शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीनंतर अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील आमदार शंकरराव गडाख काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. आज त्यांनी आपल्या मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेत आपण उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं स्षट्ट केलं आहे.

पुढे वाचा ...
अहमदनगर 11 जुलै : ठाकरे सरकारमध्ये शिवबंधन बांधून मंत्रिपद मिळवलेले अपक्ष आमदार शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांनी उद्धव ठाकरेंनाच (Uddhav Thackeray) साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.. सत्ता असो वा नसो आपण उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीनंतर अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील आमदार शंकरराव गडाख काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. आज त्यांनी आपल्या मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेत आपण उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं स्षट्ट केलं आहे. एकनाथ शिंदे गटाला मिळाला 'सुप्रीम' दिलासा, शरद पवार म्हणाले... शंकरराव गडाख नगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. त्यांनी आपल्या क्रांतिकारी शेतकरी पक्षातर्फे विधानसभेची निवडणूक लढविली होती. भाजपच्या बाळासाहेब मुरकुटे यांचा त्यांनी पराभव केला होता. महाविकास आघाडीची स्थापना होण्यापूर्वीच त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. शंकरराव गडाख म्हणाले, उद्धव ठाकरेंसोबत जायचं की भाजप-शिंदे गटासोबत जायचं याबद्दल द्विधा मनस्थिती होती. हे सरकार पडणार असल्याची अगोदरच चर्चा होती. शिवसेनेचे अनेक आमदार राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळे नाराज होते. पुढे त्यांनी सांगितलं की मलाही गुहावटीमधून फोन आले. अनेक आमदार येणार आहेत तुम्हीही या असा फोन आला. काय निर्णय घ्यावा याची मनात घालमेल होती सुरू होती. मात्र, राजकारणात केवळ फायदा तोटा बघून चालत नाही. त्यामुळे आपणही सत्तेत असो किंवा नसो पण उद्धव ठाकरेंसोबतच राहायचं, असा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. VIDEO: ठाकरेंवर टीका करणारे बंडखोर आमदार भरत गोगावले यांच्या कारला अपघात; 7 गाड्यांची धडक पुढे ते म्हणाले, की असे राजकीय प्रसंग येत असतात. घरातलेच आमदार सोडून गेल्याने उद्धव ठाकरेंनीच हे केलं की काय अशीही चर्चा होती. त्यामुळे आपण ठाम राहीलो तर निर्णय चुकतो का अशीही धाकधुक होती. परंतु कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत याचा आनंद आहे. मंत्रीपद गेल्यापेक्षा कामं थांबल्याचं दुखः आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी हा प्रसंग संयमाने हाताळला तसं आपणही संयमानं पुढं जावू, असंही ते म्हणाले.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Uddhav thackeray

पुढील बातम्या