अहमदनगर, 26 मे : आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीवेळी फडणवीसांसमोरच मान-अपमान नाट्य रंगल्याचं पहायला मिळालं. बैठकीवेळी स्टेजवर खुर्ची न मिळाल्यानं भाजप आमदार राम शिंदे चांगलेच नाराज झाले. ते थेट स्टेजवरून निघाले. मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पुन्हा बोलावलं. स्टेजवर येण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांना खुर्ची देण्यात आली. विशेष म्हणजे फडणवीसांच्या एका बाजूला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तर दुसऱ्या बाजूला आमदार राम शिंदे यांना बसवण्यात आलं.
जोरदार चर्चा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच हे मानापमान नाट्य घडल्यानं या प्रसंगाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीवेळी खुर्ची न मिळाल्यानं राम शिंदे नाराज झाले. ते स्टेजवरून निघून चालले होते. मात्र त्यांना फडणवीसांनी पुन्हा बोलावलं. त्यानंतर राम शिंदे यांना स्टेजवर खुर्ची देण्यात आली.
आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीवेळी फडणवीसांसमोरच मान-अपमान नाट्य रंगल्याचं पहायला मिळालं. pic.twitter.com/NpLXYH90Yq
— News18Lokmat (@News18lokmat) May 26, 2023
फडणवीस अहमदनगर दौऱ्यावर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते नवीन शासकीय विश्रामगृहाचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी अहमदनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्येच हे मानापमान नाट्य रंगल्याचं पहायला मिळालं. तसेच त्यांनी यावेळी जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला देखील मार्गदर्शन केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Devendra Fadnavis