मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अहमदनगरमध्ये केमिकल कंपनीत अग्नितांडव, घटनास्थळाचा पहिला VIDEO

अहमदनगरमध्ये केमिकल कंपनीत अग्नितांडव, घटनास्थळाचा पहिला VIDEO

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये एका  केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

श्रीरामपूर, 28 मार्च : अहमदनगर (ahamadnagar) जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये एका केमिकल कंपनीला भीषण(chemical company fire) आग लागल्याची घटना घडली आहे. आग मोठ्या प्रमाणात पसरली असून संपूर्ण कंपनी आगीच्या भक्षस्थानी सापडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूरमधील एमआयडीसीमध्ये  एका केमिकल कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली. आग कशामुळे लागली याचे  कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आगीने प्रचंड रौद्ररुपधारण केले असून संपूर्ण कंपनी आगीच्या भक्षस्थानी सापडली आहे. धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत आहे. आग लागल्यानंतर स्फोटांचेही आवाज येत आहे. या आगीमध्ये कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी श्रीरामपूर, लोणी, राहता येथील अग्निशमक दल दाखल झाले आहे. आग आटोक्यात आणण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.

भडगावात कॉम्प्लेक्स मधील दोन दुकानांना भीषण आग: 12 लाखाचा मुद्देमाल जळून खाक

दरम्यान, जळगाव  जिल्ह्यातील भडगावातील पवार शॉपिग मध्ये  दोन दुकान ला शॉट सर्किटने पहाटेच्या सुमारास आग लागल्याने लाखोचे नुकसान झाले. ही आग नगरपरीषद अग्निशामक दलाच्या सहाय्याने विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत  दोन्ही दुकानतील 9 लाखाचा मुद्देमाल जळून खाक झाला.

(दुचाकी घेण्यासाठी 1 रुपयाची 2.6 लाख नाणी घेऊन शोरूममध्ये पोहोचला तरुण अन्..)

आग लागल्यानंतर परिसरातील दुकानदार व रहिवासी यांनी आग विझविण्यासाठी तत्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणली. यामुळेच ही आग पुढे न वाढल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या आगीत कॉम्प्लेक्समधील लागलेल्या आगीत सुनील पाटील यांच्या समर्थ लॅबमधील मशनरी व फर्निचर असा 9 लाखाचा मुद्देमाल तर सुभाष पाटील यांच्या आकाश मोबाईल शॉपीतील 3 लाखाचा मुद्देमाल असा एकूण 12 लाख रुपयाचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे.

First published: