मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Maharashtra Police Recruitment: तरुणांनो पोलीस भरतीच्या तयारीला लागा; राज्यात लवकरच 7200 पदांसाठी होणार भरती

Maharashtra Police Recruitment: तरुणांनो पोलीस भरतीच्या तयारीला लागा; राज्यात लवकरच 7200 पदांसाठी होणार भरती

Maharashtra Police Bharati 2022: राज्यात आता तब्बल 7200 नव्या पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

Maharashtra Police Bharati 2022: राज्यात आता तब्बल 7200 नव्या पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

Maharashtra Police Bharati 2022: राज्यात आता तब्बल 7200 नव्या पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

अहमदनगर, 29 जानेवारी : राज्यातील तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण राज्यात आता मोठी पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment) होणार आहे. या संदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Maharashtra Home Minister Dilip Walse Patil) यांनी माहिती दिली आहे. पोलीस खात्यात आता नव्याने 7 हजार 200 पदांसाठी भरती (Recruitment for 7200 posts in Police department) होणार आहे. राज्य मंत्रिडळात या संदर्भात निर्णय झाला असून लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. (Maharashtra Police Bharati 2022 latest news)

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं, पोलीस भरतीच्या संदर्भात राज्यात 5200 पोलिसांच्या भरतीचं काम जवळपास पूर्णत्वाच्या दिशेने आहे. लेखी परीक्षा झाल्या, शारीरिक चाचण्या झाल्या आहेत. आता या संदर्भातील अंतिम यादी जाहीर करण्याचं काम आहे.

दुसऱ्या टप्प्यात आणखी 7200 पोलिसांच्या भरतीच्या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे आणि या संदर्भातील भरती प्रक्रियेची सुरुवात आता येत्या काही दिवसात सुरू करायची आहे असंही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं. अहमदनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

वाचा : Railtel Recruitment 2022: 'रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!

निर्भया पथकामुळे महिला सुरक्षिततेला अधिक बळकटी

प्रजासत्ताक दिनी राज्यात निर्भया पथक आणि इतर उपक्रमांच्या माध्यमातून महिला सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचं पाऊल टाकलं. या उपक्रमाच्या माध्यमातून महिला सुरक्षेच्या कामाला अधिक बळकटी प्राप्त होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 26 जानेवारी रोजी निर्भया पथक आणि इतर उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, निर्भया पथक आणि महिला सुरक्षिततेच्या उपायजोनांचे विविध उपक्रम सुरू करुन मुंबई पोलिसांनी एक स्तुत्य काम केले आहे. त्याबद्दल गृहमंत्री आणि मुंबई पोलीस दलाचे विशेष कौतुक आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला सक्षमपणे काम करत आहेत. विविध क्षेत्रात त्यांची ही घोडदौड सुरू असताना समाजातील सामान्यातल्या सामान्य महिलेला सुरक्षितता पुरवणे गरजेचे आहे.

आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. ते मातृभक्त होते. आपण झाशीच्या राणीचे नाव घेतो, आपल्या महाराष्ट्राला साधुसंतांची शिकवण आणि संस्कार आहे. परंतु जिथे महिलांवर दुर्दैवाने अत्याचार घडतात तिथे कायद्याचा वचक निर्माण करणारी ही निर्भया पथके महत्त्वाची ठरणार आहेत.

First published:
top videos

    Tags: Ahmednagar, Job, Maharashtra police