मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले, आता साखर कारखानाही गमावला, पिचड पिता-पूत्रांना ट्रिपल धक्का

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले, आता साखर कारखानाही गमावला, पिचड पिता-पूत्रांना ट्रिपल धक्का

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या पिचड पिता-पूत्रांना एकामागोमाग एक धक्के बसतच आहेत. अगस्ती साखर कारखान्यावरच्या पिचड यांच्या 28 वर्षांच्या निर्विवाद सत्तेला सुरूंग लागला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ahmadnagar, India
  • Published by:  Shreyas

अकोले, 26 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या पिचड पिता-पूत्रांना एकामागोमाग एक धक्के बसतच आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही पिचड समर्थकांच्या पदरी निराशा आली, यानंतर आता अगस्ती साखर कारखान्याच्या निवडणुकीतही पिचड गटाचा मोठा पराभव झाला आहे, या पराभवामुळे अगस्ती साखर कारखान्यावरच्या पिचड यांच्या 28 वर्षांच्या निर्विवाद सत्तेला सुरूंग लागला आहे.

अगस्ती साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार वैभव पिचड यांच्यापाठोपाठ ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचाही पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अशोक भांगरे यांनी पिचड यांना पराभवाचा धक्का दिला आहे. विरोधकांचा सर्वच्या सर्व 21 जागांवर विजय झाल्यामुळे हा पिचड यांना मोठा धक्का मानला जात आहे. या पराभवामुळे पिचड यांनी आमदारकी, ग्रामपंचायतनंतर आता साखर कारखान्याचीही सत्ता गमावली आहे.

दरम्यान या निवडणूक निकालाविरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचं वैभव पिचड म्हणाले आहेत. जनशक्तीविरोधात धनशक्तीचा विजय झाल्याचा आरोप वैभव पिचड यांनी केला आहे. तसंच अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी येत आहेत. प्रशासनानेही याची कोणतीही दखल घेतलेली नाही, त्यामुळे आम्ही न्यायालय आणि आयोगाकडे दाद मागू, असं वैभव पिचड म्हणाले आहेत.

First published: