हरिष दिमोटे (संगमनेर/अहमदनगर), 31 मार्च : शेतकरी मुलांच्या लग्नाचा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. शेतकरी मुलाशी लग्न करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील एका गावाने शेतकरी अर्धांगिनी योजना सुरू केलीय. या योजनेनुसार गावातील शेतकरी मुलाशी लग्न करणाऱ्या मुलीला रोख 5555 रूपये आणि संसारपयोगी वस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे.
संगमनेर तालुक्यातील दरेवाडी हे छोटसं गाव आहे. या गावातील अनेक तरुण शेती व्यवसाय करतात. आधुनिक शेती आणी नविन तंत्रज्ञानानाच्या जोरावर शेतकरी तरूण सधन झाले असले तरी त्यांच्या लग्नाचा प्रश्न मात्र गंभीर बनलेला आहे. शेतकरी नवरा नको गं बाई.. अशी काहीशी मानसिकता मुलींची झालेली आहे.
70 रु. किलो, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्याने पिकवला काळा गहू; साधा गहू अन् यात काय आहे फरक?
त्यासाठी या गावच्या सरपंचांनी लग्नाला प्रोत्साहन देण्यासाठी एक अफलातून कल्पना गावकऱ्यांपुढे मांडली आणि गावाने सर्वानुमते "शेतकरी अर्धांगिनी योजना" काही सुरू केली आहे. शेतकरी मुलाशी लग्न करणाऱ्या मुलीला 5555 रूपये रोख आणि गरजेनुसार संसारोपयोगी साहित्य दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तीन महिन्यांपूर्वी लोकनियुक्त सरपंच झालेल्या आनंदा दरगुडे यांनी गावचा सर्वे केला. त्यात त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली कि गावातील अनेक तरूण अविवाहित आहेत. शेतकरी जगाचा पोशिंदा असं म्हणतात. शासन आणि लोक शेतकऱ्यांबद्दल केवळ गोड बोलतात मात्र मुली देण्यास टाळाटाळ करतात अशी खंत गावकरी व्यक्त करताहेत.
Sangli News : शेतकऱ्याच्या जिद्दीची कमाल, ओसाड जमिनीतून करतोय लाखोंची कमाई, पाहा Video
शेतकरी अर्धांगिनी योजनेमुळे किती तरुणांना याचा फायदा होईल सांगता येणार नाही. मात्र आज मुलींना केवळ जी शहरी जिवनातील लखलखती दुनिया भुरळ घालतेय यातून बाहेर पडून शेतकरी नवराच बरा गं बाई.. ही मानसिकता तयार होणे गरजेचे आहे. कारण तो शेतकरीच आहे जो कशाही परिस्थितीचा सामना करत पुन्हा उभं राहत असतो त्याला गरज आहे मुलींनी साथ देण्याची.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Local18