मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'कुणी त्रास दिला तर...' थोरातांच्या होमग्राऊंडमध्ये विखे पाटलांनी दिला थेट इशारा

'कुणी त्रास दिला तर...' थोरातांच्या होमग्राऊंडमध्ये विखे पाटलांनी दिला थेट इशारा

काँग्रेस पक्षाला आता जनाधार राहिला नाही. पक्षाचे सगळे वरीष्ठ नेते पक्ष सोडून जात आहेत.

काँग्रेस पक्षाला आता जनाधार राहिला नाही. पक्षाचे सगळे वरीष्ठ नेते पक्ष सोडून जात आहेत.

काँग्रेस पक्षाला आता जनाधार राहिला नाही. पक्षाचे सगळे वरीष्ठ नेते पक्ष सोडून जात आहेत.

संगमनेर, 28 ऑगस्ट : 'मागच्या अडीच वर्षात केवळ केंद्राकडे बोट दाखवण्याचं काम सुरू होतं. महाराष्ट्रातले मंत्री काय भजे खात होते का? इतिहासात पहिल्यांदा एवढं मोठं भ्रष्टाचारी सरकार पाहिलं नाही, असं म्हणत भाजपचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil) यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तसंच, तुम्हाला जर कुणी त्रास दिला तर मी समर्थ आहे, असं म्हणत विखेंनी बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांच्यावर निशाणा साधला. महसूलमंत्री झाल्यानंतर आज संगमनेरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा नागरी सत्कार सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात हा सोहळा पार पडला. यावेळी विखेंनी थोरातांवर निशाणा साधला. 'आज महाराष्ट्रात जनतेचं सरकार आलं आहे. आघाडी सरकारमध्ये केवळ लुट सुरू होती. आघाडी सरकारच्या काळात राज्याची पिछेहाट झाली आहे. महाविकास आघाडी सरकारचा समान विकासाचा नाही तर समान वसुलीचा कार्यक्रम होता. या वसुलीच्या कार्यक्रमाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. अभद्र युतीमुळे शिवसेनेचे चाळीस आमदार कधी निघून गेले कळलंच नाही, असा टोला विखेंनी शिवसेनेला लगावला. 'संगमनेर तालुक्यात कोरोना काळात जनतेची आर्थिक लूट झाली. सरकार म्हणून आपली जबाबदारी पार पाडली नाही. आता सत्तांतर झालंय त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. जनतेचं काम आता मला करायचंय. आता तुमचा त्रास संपलेला आहे. पक्ष संघटनेकडे तुम्ही लक्ष द्या', असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर मतदारसंघातील कार्यकर्त्यांना आवाहन केलं. (Mohit Kamboj vs NCP : मोहीत कंबोज यांच्या रडारवर राष्ट्रवादी, आणखी एका बड्या महिला नेत्यांना दिला इशारा) 'काँग्रेस पक्षाला आता जनाधार राहिला नाही. पक्षाचे सगळे वरीष्ठ नेते पक्ष सोडून जात आहेत. आपल्या विचारांशी फारकत घेतली म्हणून शिवसेनेचे चाळीस आमदार सोडून गेले. आज इथं कोण कोण आलंय याचा लगेच निरोप जाईल. मात्र आपण अजिबात घाबरू नका. कुणी त्रास दिला तर मी समर्थ आहे', असं म्हणत विखेंनी नाव न घेता थोरातांवर टीका केली. (शिवसेना बांधणीसाठी उद्धव ठाकरेंनी केले पक्षात तीन मोठे फेरबदल यांच्यावर जबाबदारी) 'निळवंडे धरणाच्या कामाचे संपूर्ण श्रेय हे फडणवीसांचे आहे. फडणविसांनी निधी दिला म्हणून आज काम प्रगतीपथावर आहे. निळवंडे धरणाच्या कालव्यांचे लवकरच काम पूर्ण होणार आहे. सरकारची कारकिर्द संपण्याअगोदर लाभक्षेत्रात पाणी देणार आहोत', अशी ग्वाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
First published:

Tags: Lokmat news, Lokmat news 18, Marathi news, राधाकृष्ण विखे पाटील

पुढील बातम्या