अहमदनगर, 29 नोव्हेंबर : परीक्षेत अनेक गोष्टींची आवश्यकता असते, त्यापैकी एक म्हणजे परीक्षा पॅड, ज्यावर उत्तरपत्रिका ठेवून प्रश्न सोडवले जातात, जेणेकरून उत्तर लिहायला अडथळा निर्माण होणार नाही आणि उत्तरपत्रिका फाटणार नाही. मात्र, हे पॅड नक्की बनतात कसे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असले. अहमदनगरमध्ये हे पॅड बनवण्याचा कारखाना आहे. विशेष म्हणजे एका महिलेने उभारलेल्या हा कारखाना असून इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सर्व महिलाच आहेत.
महिला आता चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित राहिल्या नाहीत, महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रणी आहेत. महिला आपले स्वतःचे उद्योग व्यवसाय सुरू करून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत. यातून ज्या महिला यशस्वी झाल्या त्या समाजासाठी आदर्शवत ठरतात. आपणही काहीतरी करू शकतो, या इच्छाशक्तीवर नगर जिल्ह्यातील स्मिता घोडके यांनी व्यवसाय सुरू केला. यात त्यांना पतीची साथ मिळाली आणि त्या यशस्वी उद्योजिका बनल्या. आज त्यांचा साई इंटरप्राईजेस हा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालत आहे.
MBA तरुणीचं नवं स्टार्टअप, मुंबईत सुरु केलं 'व्रॅप हाऊस', Video
नगर शहरातील केडगाव भागातील स्मिता घोडके यांनी पाच महिलांना सोबत घेत साई इंटरप्राईजेस हा व्यवसाय सुरू केला. या कारखान्यात ऑफिस फाईल, बॉक्स फाईल, साध्या फाईल, शाळेचे पॅड, कार्टून डिझाईन पॅड, पॉलिटिकल डिझाईन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या डिझाईनचा स्पेशल पॅड बनवले जातात. दर्जेदार मटेरियल आणि वेगवेगळ्या व्हरायटीमुळे येथील तयार वस्तूंना बाजारात चांगली मागणी आहे. राज्यभरात येथील तयार साहित्याची विक्री होते.
Video : नोकरी करण्यापेक्षा देणारे बना! सरकारकडून मिळेल मोफत मार्गदर्शन
सर्व काम महिलाच करतात
अगदी पुठ्ठ्यापासून ते शेवटच्या एका हूक बसवण्यापर्यंत इथे फक्त महिला आणि महिलाच काम करतात, एखाद्या कुटुंबात ज्या पद्धतीने एखादी जबाबदारी पार पाडली जाते, तसेच या ठिकाणी महिला आपलं काम पार पाडतात यातून मिळणारा नफा हा पुन्हा या व्यवसायात गुंतवला जातो.
राज्याबाहेर देखील मागणी
कोरोनापूर्वी हा व्यवसाय सुरू झाला. मात्र, कोरोनामुळे बराच काळ हा व्यवसाय थांबला. मात्र आता कोरोनानंतर पुन्हा एकदा व्यवसायाने भरारी घेतली आहे. येथील क्वालिटी पाहता ओडिसामधून देखील साहित्याची मागणी होत आहे. केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळत आहे. व्यवसाय चांगला चालत असल्यानं महिला खूश आहेत. येथील कामातून कुटुंबाला हातभार लागतो, अशी भावना येथील महिला व्यक्त करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Local18