मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिर्डी स्थानकात एक्सप्रेसमध्ये आढळला मृतदेह; मृताच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीने खळबळ

शिर्डी स्थानकात एक्सप्रेसमध्ये आढळला मृतदेह; मृताच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीने खळबळ

कालका साईनगर एक्स्प्रेसमध्ये एक मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.. ही घटना साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावर काल रात्रीच्या सुमारास उघड झाली (Dead Body in Express Train)

अहमदनगर 03 सप्टेंबर : कालका साईनगर एक्स्प्रेसमध्ये एक मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मयत व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. ही घटना साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावर काल रात्रीच्या सुमारास उघड झाली. रेल्वेची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्ती हिमाचल प्रदेश येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे. दोन घटनांनी महाराष्ट्र हादरलं! पतीसोबत वाद, 2 चिमुकल्यांना विष पाजलं आणि... दिल्लीहून शिर्डीला येणाऱ्या रेल्वेत हा मृतदेह सापडला आहे. महेंद्रसिंह बंबू (हिमाचल प्रदेश) असं रेल्वेतील मृतावस्थेत सापडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. शिर्डीला येणाऱ्या रेल्वेत कोरोना पॉझिटिव्ह डेड बॉडी बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. मृताच्या खिशामध्ये सापडलेल्या रिपोर्टवरुन तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा खुलासा झाला. मुलाच्या आत्महत्येचं दुःख सहन न झाल्याने आईनेही उचललं भयानक पाऊल, पालघरमधील धक्कादायक घटना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी शिर्डी नगरपालिका यांना घटनेची माहिती दिल्यावर प्रशासन घटनास्थळी दाखल झालं. साईनगर शिर्डी रेल्वे पोलीस, शिर्डी नगरपालिका आणि शिर्डी पोलिसांच्यावतीने सध्या या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. मात्र, एका व्यक्तीचा रेल्वेत अशाप्रकारे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. बुलढाण्यात शेतात सापडला युवकाचा मृतदेह दुसऱ्या एका घटनेत बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात असलेल्या इतका परिसरातील एक 28 वर्षे युवक गणपती आगमनाच्या दिवशीपासून बेपत्ता होता. सदर इसमाचा मृतदेह हा शेगाव शहरातील सुरभी नगरला लागून असलेल्या एका शेततळ्यामध्ये आढळला आला. याबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून मृतकाच्या नातेवाईकांनीही शहर पोलीस स्टेशनला त्या संदर्भात तक्रार नोंदवली आहे.
First published:

Tags: Dead body, Train

पुढील बातम्या