मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Heat Wave Alert! पुढील 5 दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट; 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

Heat Wave Alert! पुढील 5 दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट; 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

Latest Weather Forecast: गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा (Temperature in maharashtra) वाढला आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येणार असून हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

औरंगाबाद, 27 मार्च: काल आणि आज सकाळपासून मध्य आणि वायव्य भारतात अनेक ठिकाणी वेगवान वारे वाहत (Gusty wind) आहे. तर काही भागात उष्णतेचा चटका (temperature in maharashtra) वाढला आहे. गुजरातसह हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी उष्णतेची तीव्रता वाढली आहे. तर मार्च एंडला विदर्भासह पश्चिम राजस्थान, दक्षिण हरियाणा, पश्चिम मध्य प्रदेशात सूर्य आग ओकण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट (heat wave) येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

येत्या तीन दिवसांत पश्चिम हिमालयातील काही भागासह गुजरातमधील काही ठिकाणी उष्णतेची लाट धडकण्याची शक्यता आहे. तर पुढील चार ते पाच दिवसात पश्चिम मध्यप्रदेश, विदर्भ आणि राजस्थानात उन्हाचा चटका वाढणार आहे. त्यानंतर 29 ते 31 मार्च दरम्यान महिन्याच्या शेवटी दक्षिण पंजाब, दक्षिण हरियाणा, बिहार, झारखंड, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सूर्य आग ओकण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा-शरीरातील नसांचं कार्य सुरळीत ठेवतात या 5 गोष्टी; आहारात घ्यायला विसरू नका

खरंतर, गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदला आहे. हवामान खात्याने आज आणि उद्या बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 29 मार्चनंतर राज्यात उष्णतेची दाहकता आणखी वाढण्याची शक्यता आहे. 29 आणि 30 मार्च रोजी अहमदनगर, औरंगाबाद, जालना, जळगाव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांत उष्णतेची लाट धडकणार आहे. या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.

त्यानंतर महिन्याच्या शेवटी 31 मार्च रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांना उन्हापासून किंचितसा दिलासा मिळणार आहे. तर जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि परभणी या सहा जिल्ह्यांत उन्हाची तीव्रता कायम राहणार आहे. उर्वरित महाराष्ट्रातील कमाल तापमान 35 ते 40 च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. गेल्या चोवीस तासात महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसहून अधिक नोंदलं आहे.

First published:

Tags: Aurangabad, IMD FORECAST, Weather forecast