मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिर्डीत अनोख्या पद्धतीने साजरी होते हनुमान जयंती; 125 किलो वजनाचा दगड खांद्यावर उचलण्याची स्पर्धा, पाहा VIDEO

शिर्डीत अनोख्या पद्धतीने साजरी होते हनुमान जयंती; 125 किलो वजनाचा दगड खांद्यावर उचलण्याची स्पर्धा, पाहा VIDEO

आज 16 एप्रिलला हनुमान जयंती (Hanuman Jayanti) आहे. शिर्डीत हनुमान जयंती निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धांच आयोजन केले जाते. यामुळे यावर्षीदेखील हनुमान जयंतीच्या निमित्ताने शिर्डीत (Hanuman Jayanti Shirdi) अनोख्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

सुनील दवंगे, प्रतिनिधी

शिर्डी, 16 एप्रिल : आज 16 एप्रिलला हनुमान जयंती (Hanuman Jayanti) आहे. शिर्डीत हनुमान जयंती निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धांच आयोजन केले जाते. यामुळे यावर्षीदेखील हनुमान जयंतीच्या निमित्ताने शिर्डीत (Hanuman Jayanti Shirdi) अनोख्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

हनुमान जयंतीच्या निमित्ताने शिर्डीतील परंपरा काय?

हनुमान मंदिरासमोर 125 किलो वजनाचा दगड खांद्यावर घेवून शक्तीचे उपासक बजरंगबलीची पूजा केली जाते. आजच्या दिवशी अनेक तरुण याठिकाणी आपली शक्ती सादर करतात. तरुणांनी बुद्धीमान बरोबरच शक्तीशाली असणेही महत्त्वाचे आहे, त्यामुळे दरवर्षी तरुण बजरंग गोटा उचलण्यासाठी येथे जमतात.

शिर्डीच्या हनुमान मंदिरात आज मारुती जन्मदिनानिमित्तानं दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. सर्वजण मारुतीसमोर नतमस्तक होताय.. हनुमानाला रुईच्या पाणांची माळा अर्पणही केली जाते आहे.

हेही वाचा - जगातील सर्वात बोल्ड आजीबाई सांगतीये 'तारुण्याचं' रहस्य; सुचवलं हे खास पेय

यामागचा उद्देश्य काय? 

तरुणांना प्रेरणा मिळावी आणि त्यांनी वाईट सवयींमध्ये अडकू नये, यासाठी आज येथे बजरंग गोटा खांद्यावर उचलून स्वत:ला खंबीर बनवण्याचा प्रयत्न करण्याची स्पर्धात्मक परंपरा आहे. जमलेले तरुण बजरंग गोटा उचलण्यासाठी दरवर्षीप्रमाणे पुढे आले आहे. अनेक तरुणांनी प्रयत्न केले, त्यात काही तरुणांनाच यश मिळाले. काही तरुणांना फक्त हात उचलता आला, तर काही तरुणांनी दगड अर्ध्यावर उचलला, पण पुढे तो उचलता आला नाही. येथे शक्तीसोबतच मन आणि पराक्रमी हनुमानावरील श्रद्धा आवश्यक असते. काही तरुण वर्षभर प्रयत्न करतात आणि आजही हनुमान जयंतीच्या दिवशी 125 किलोचा बजरंग गोटा खांद्यावर उचलून जयघोष करतात.

First published: