मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिर्डीत साई पालखी नेणाऱ्या भाविकावर गोळीबाराने खळबळ, एक जण जखमी

शिर्डीत साई पालखी नेणाऱ्या भाविकावर गोळीबाराने खळबळ, एक जण जखमी

 साई पालखी ही मुंबईतील गोरेगाव इथून शिर्डीला आली होती. गोळीबारात जखमी झालेल्यावर शिर्डीत साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

शिर्डी, 30 डिसेंबर :  शिर्डीजवळ साई पालखी घेऊन येणाऱ्यांवर गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये एकजण जखमी झाला असल्याची माहिती समजते. अज्ञाताकडून हा गोळीबार करण्यात आला आहे. यात जखमी झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलंय.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिर्डीजवळ सावळीविहीर इथं अज्ञात तरुणाने गोळीबार केला. साई पालखी घेऊन येणाऱ्यांवर करण्यात आलेल्या या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. त्याच्या खांद्याला गोळी लागली आहे. जखमीला शिर्डीतील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

हेही वाचा : VIDEO पुण्यातील कोयता गँगचा केला 'करेक्ट कार्यक्रम'; पोलिसांनी सांगितला तो अनुभव

गोळीबाराचे कारण वैयक्तिक किंवा पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. साई पालखी ही मुंबईतील गोरेगाव इथून शिर्डीला आली होती. गोळीबारात जखमी झालेल्यावर शिर्डीत साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत. तर या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

First published:

Tags: Gun firing, Shirdi