Home /News /maharashtra /

अहमदनगरच्या नातवानं जन्माचे पांग फेडलं, आजोबांना शरीरातलं दिलं 60 टक्के लिव्हर

अहमदनगरच्या नातवानं जन्माचे पांग फेडलं, आजोबांना शरीरातलं दिलं 60 टक्के लिव्हर

'आजोबा नातवाचे पहिले मित्र असतात आणि नातू हा आजोबांचा शेवटचा मित्र असतो', असं म्हटलं जातं. अगदी या वाक्याला साजेल अशी घटना अहमदनगरमध्ये घडली आहे.

    सुनिल दवंगे, प्रतिनिधी अहमदनगर, 27 मे : मानवी नाते हे भावभावनांनी भरले आहे. ते अमूल्य असून कोणत्याही परिमाणात मोजता येणार नाही. समाजात काही कल्पनेपलीकडील घटना घडत असतात. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथेही अशीच एक भावनांचे बंध उलगडणारी घटना घडली आहे. म्हणटलं जात की, 'आजोबा नातवाचे पहिले मित्र असतात आणि नातू हा आजोबांचा शेवटचा मित्र असतो'. अगदी या वाक्याला साजेल अशी घटना घडली आहे. 72 वर्षाच्या आजोबांना 22 वर्षाच्या नातवानं 60 टक्के लिव्हर देवून मोठ्या आजारातून बाहेर काढलं आहे. राहाता येथील शेतकरी सखाहरी सदाफळ उर्फ 'सखानाना' यांना डिसेंबर 2021 मध्ये पायांना आणि पोटाला सूज येण्यास सुरुवात झाली. मुलगा सुनील याने वडिलांना फॅमिली डॉक्टरला दाखवले. विविध चाचण्या केल्यानंतर सखानाना यांचे लिव्हर खराब झाल्याचे सांगण्यात आले. कुठलेही व्यसन नसताना लिव्हरच्या आजाराने गाठल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील खाजगी रुग्णालयातमध्ये दाखल केले. दाता शोधून लिव्हर प्रत्यारोपण करावे लागेल, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. एकतर शेतकरी, त्यात अशा आजारांची काही माहिती नसल्याने सदाफळ कुटुंबिय धास्तावले. लिव्हरसाठी दाता शोधायचा कुठे? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. नातू झाला लिव्हर दाता यावेळी नातू आदित्य सुनिल सदाफळ याने आजोबांसाठी लिव्हर दान करण्याचे ठरविले. आदित्य दाता होण्यास तयार झाला. नातवाचा आणि आजोबांचा रक्तगट जुळाला. आठ दिवसांपूर्वी त्याच्या लिव्हरचा साठ टक्के भाग काढण्यात आला. शस्त्रक्रिया करत आजोबाचे लिव्हर काढून टाकण्यात आले. त्याजागी नातवाने दिलेल्या लिव्हरचा भागाचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. आठ दिवसांच्या उपचारानंतर नातू आदित्य घरी परतला आहे. आपल्या आजोबांना चिरंजीवी भेट देणारा नातू म्हणून त्याचे कौतूक केले जात आहे. आजच्या मर्यादित नाते जपणाऱ्या युगात नाते फक्त सेल्फी आणि डीपी पुरते न ठेवता आदित्यने समाजातील असंख्य नातवांसाठी एक आदर्श ठेवला आहे. (दगडूशेठ हलवाई मंदिराजवळ गेले, पण दर्शन न घेताच शरद पवार परतले, कारण....) यावेळी बोलतांना आदित्य सांगतो की, 'आमचे नाना आपल्या खांद्यावर बसवून मला फिरवायचे. नानांनी माझे खूप लाड पुरवले आहेत. इतरवेळी नानांनी मला संभाळले, सावरले, जपले. एक चांगला मित्र म्हणून नेहमी माझ्या पाठीशी उभे राहीलेत. मग आता मी माझ्या मित्रासोबत उभा आहे. नानांनी केलेल्या कोणत्याच गोष्टींची परतफेड होवू शकत नाही. मी तर फार लहान काम केले आहे. लिव्हर दान देणारा मी कोण? कारण मी आज त्यांच्यामुळेच आहे. नाना तीन महिन्यात ठणठणीत बरे होणार आहेत. औषध उपचार घेवून मी घरी आलो. डॉक्टरांनी मला जड वस्तू उचलण्यास मनाई केली आहे.' आदित्य जरी त्याने केलेले लिव्हर दान किरकोळ मानत असला तरी 72 वर्षांच्या सखाहरी सदाफळ यांच्यासाठी नविन जन्म आहे. कोरोनातून सावरल्यानंतर आज आदित्यच्या या लिव्हर दानामुळे सखानाना पुन्हा समाजात उभे राहतील यात शंकाच नाही.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Ahmednagar, Ahmednagar News, Maharashtra News

    पुढील बातम्या