Home /News /maharashtra /

अहमदनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा ताफा चौंडीच्या वेशीवर पोलिसांनी अडवला

अहमदनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा ताफा चौंडीच्या वेशीवर पोलिसांनी अडवला

नगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोतांचा ताफा पोलिसांनी अडवला

नगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोतांचा ताफा पोलिसांनी अडवला

अहमदनगरमधील चौंडी येथे निघालेल्या गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा ताफा पोलिसांनी रोखला आहे.

अहमदनगर, 31 मे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांची आज 297वी जयंती आहे. या निमित्त चोंडी येथे जयंतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाला शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित आहेत. त्याच दरम्यान चौंडीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे निघाले असता पोलिसांनी त्यांचा ताफा रोखला आहे. चौंडीच्या वेशीवर पोलिसांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना रोखले आहे. गोपीचंद पडळकर यांचा ताफा रोखल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाले असून पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांत बाचाबाची सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे. तसेच भाजपचे कार्यकर्ते गोपीचंद पडळकर यांच्या बाजूने जोरदार घोषणाबाजी सुद्धा करत आहेत. पोलिसांनी ताफा अडवल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं, चोंडीमध्ये आम्ही जाणार, अहिल्यादेवींच्या चरणी नतमस्तक होणार. तिथली माती आमच्या सर्व युवकांच्या कपाळाला लावणार आणि येथून उर्जा घेऊन आम्ही जाणार. जोपर्यंत चौंडी येथे अहिल्यादेवींचं दर्शन होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही. पोलिसांची परवानगी घेण्याची आम्हाला गरज नाही. यापूर्वी शरद पवारांनी येथे जयंतीचा कार्यक्रम घेतला नाही. कोण शरद पवार?, कोण रोहित पवार? असा सवालही गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं, मी 19 तारखेला पोलिसांना पत्र दिलं आहे. तुम्ही 25 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसला परवानगी कशी देता असा सवालही गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे. वाचा : आठव्या वर्षी लग्न, 21 व्या वर्षी विधवा नंतर एका निर्णयाने बदललं आयुष्य! वाचा होळकर सम्राज्ञीची कहाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आज चौंडी येथे अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्यास उपस्थित आहेत तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे सुद्धा चौंडी येथे पोहोचणार आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोप आज चौंडीत होणार आहे. त्यामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी शरद पवार आणि गोपीचंद पडळकर हे आमने-सामने येऊन राजकीय संघर्ष होण्याची चिन्ह असल्याने खबरदारी म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. गोपीचंद पडळकर हे चौंडीच्या दिशेने येत असल्याचं कळताच त्यांचा ताफा पोलिसांकडून अडवण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजकारण आणल्याचा आरोप भाजपने केला आहे. आज आमदार गोपीचंद पडळकर श्री क्षेत्र जेजुरी गडावर मल्हारी मार्तंड खंडेरायाचे दर्शन घेतले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून महादेवाला अभिषेक घातला... गोपीचंद पडळकर यांच्यासोबत सदाभाऊ खोत देखील उपस्थित होते. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले, खेड तालुक्यात वाफगावचा किल्ला आम्ही अनेक वर्षांपासन मागत आहोत. शरद पवार हा किल्ला फकट वापरत आहेत. होळकरांच्या जमिनी ढापल्या आहेत. तर सदाभाऊ खोत यांनीही टीका करत म्हटलं, चौंडीवर कब्जा करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जात आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ahmednagar, BJP, Gopichand padalkar, Sharad Pawar (Politician)

पुढील बातम्या