Home /News /maharashtra /

मरणानंतरही यातना! डोळ्यातील अश्रूंपेक्षा वेदनादायी ठरल्या पावसाच्या सरी, ताडपत्रीखाली अंत्यविधी, नगरमधील VIDEO

मरणानंतरही यातना! डोळ्यातील अश्रूंपेक्षा वेदनादायी ठरल्या पावसाच्या सरी, ताडपत्रीखाली अंत्यविधी, नगरमधील VIDEO

मयत अंकुश गायकवाड यांचा अंत्यविधी करताना भरून आलेल्या आभाळातून कोसळणाऱ्या सरी त्यांच्या मृत्युमुळे डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रू इतक्याच वेदनादायी ठरल्या आहेत. कारण मृतदेहाला अग्निसंस्कार करताना आलेल्या पावसामुळे चिता भिजण्याचा धोका निर्माण झाला होता.

पुढे वाचा ...
    सुनिल दवंगे, प्रतिनिधी अहमदनगर 30 जुलै : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असतानाच अजूनही अनेक ठिकाणी मुलभूत सुविधांची वाणवा असल्याचं विदारक चित्र समोर येत आहे. नगर जिल्ह्यातील श्रींगोंदा येथील असाच एक सुविधांचा वाणवा असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. अंत्यसंस्कारासाठी जागा नसल्याने भर पावसात ताडपत्री हातात धरून अंत्यविधी करावा लागला आहे. वरून पाऊस तर खाली चिखलात चितेची अग्नी आणि त्यामध्ये फाटकी ताडपत्री धरून अंत्यविधी उरकणारे नागरिक या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील भिंगानगाव येथील भयाण वास्तव या व्हिडिओमध्ये बघण्यास मिळत आहे. तलावात पोहण्यासाठी उतरले 5 मित्र; पण तिघेच आले बाहेर, जालन्यातील हृदयद्रावक घटना श्रीगोंदा तालुक्यातील आदिवासी भिल्ल समाजाची लक्षणीय लोकसंख्या असलेलं भिंगानगाव हे विकासापासून शेकडो मैल दूर आहे. या गावात 28 जुलै रोजी मरणानंतरच्या मरण याताना काय असतात, याचा प्रत्यय पाहायला मिळाला आहे. अंकुश गुलाब गायकवाड या आदिवासी भिल्ल समाजाच्या व्यक्तीचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आणि कुटुंबावर आभाळच कोसळलं. आभाळ नुसतं कुटुंबावरच नाही तर या अंत्यविधीवरही कोसळलं. दुर्भाग्याची सीमा काय असावी ? याचं जिवंत चित्र याठिकाणी पाहायला मिळालं आहे. मयत अंकुश गायकवाड यांचा अंत्यविधी करताना भरून आलेल्या आभाळातून कोसळणाऱ्या सरी त्यांच्या मृत्युमुळे डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रू इतक्याच वेदनादायी ठरल्या आहेत. कारण मृतदेहाला अग्निसंस्कार करताना आलेल्या पावसामुळे चिता भिजण्याचा धोका निर्माण झाला होता. येथील ग्रामपंचायत असलेल्या चोराची वाडीने नमूद ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी शेड उभा केलेलं नाही. कोणतीही सुविधा नसल्याने अंत्यविधी ग्रामस्थांना उभ्या पावसात करावा लागला आहे. अक्षरश: चितेवर ताडपत्री धरून सर्व लोकांनी त्या ठिकाणी हा अंत्यविधी पार पाडला आहे. अतिशय दुर्भाग्यपूर्ण घटना केवळ शासकीय सुविधांच्या अभावामुळे श्रीगोंदा तालुक्यातील भिंगानगाव या ठिकाणी घडली आहे. Akola : आरोग्य केंद्रालाच ‘उपचाराची’ गरज; रुग्णांच्या त्रासात भर, पाहा VIDEO देशात एकीकडे गगनचुंबी इमारती आणि प्राण्यांसाठीही अंत्यसंस्कारासाठी फाईव्ह स्टार सेवा उपलब्ध होत असते, तर एके ठिकाणी माणसाच्या मरणानंतरही त्याला मरण याताना सोसाव्या लागतात, असं चित्र भारतात पाहायला मिळतं आहे. स्वातंत्र्यांच्या 75 वर्षात आजही अनेक वाडी-वस्त्या आहेत जिथे विकासाच्या वृक्षाचं बीज रोवलेलं दिसत नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Ahmednagar News, Shocking news

    पुढील बातम्या