मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Ahmednagar: सॅण्डलमध्ये मोबाइल लपवून पेपर केला व्हायरल; कॉपी बहाद्दराचा कांड पाहून पोलीसही हैराण

Ahmednagar: सॅण्डलमध्ये मोबाइल लपवून पेपर केला व्हायरल; कॉपी बहाद्दराचा कांड पाहून पोलीसही हैराण

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Crime in Ahmednagar: आरोग्य विभाग भरती आणि म्हाडाच्या परीक्षामध्ये गैरप्रकार आढळल्यानंतर औरंगाबाद कारागृह पोलीस शिपाई भरती परीक्षेत कॉपी करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.

  • Published by:  News18 Desk

अहमदनगर, 13 डिसेंबर: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पेपरफुटीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आरोग्य विभाग भरतीच्या पेपरफुटीनंतर (Heath department recruitment exam) म्हाडाच्या परीक्षामध्येही गैरप्रकार आढळला आहे. यानंतर आता औरंगाबाद कारागृह पोलीस शिपाई भरती परीक्षेत कॉपी करणाऱ्या एका तरुणाला अटक (accused arrested) करण्यात आली आहे. आरोपीनं सॅण्डलमध्ये मोबाइल लपवून मायक्रोफोन आणि अन्य एका डिव्हायसच्या मदतीने परीक्षेचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल (Viral exam paper in whatsapp group) केला आहे. संबंधित तरुणाची चुळबुळ सुरू झाल्यानंतर परीवेक्षकांना त्याच्यावर संशय आला. त्याची झडती घेतली असता, हा गैरप्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी शनिवारी रात्री आरोपी तरुणाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. विकास पिरमसिंग बारवाल (29) असं अटक केलेल्या आरोपी परीक्षार्थीचं नाव आहे. आरोपी विकास हा जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील नांदी येथील रहिवासी आहे. आरोपीनं आपल्या उजव्या पायातील सॅण्डलमध्ये मोबाइल फोन आणि एक काळ्या रंगाचं डिव्हाईस लपवून ठेवलं होतं. तसेच त्याच्याकडे एक मायक्रोन देखील होता.

हेही वाचा-पुणे: पुतणीसोबत काकाचं घृणास्पद कृत्य, 4महिन्यांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार

या तिन्ही साधनाच्या मदतीने आरोपीनं परीक्षा केंद्रातील पेपर एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवला होता. ग्रुपवरील साथीदारांच्या मदतीने प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न आरोपी करत होता. पण त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पर्यवेक्षकांनी त्याची झडती घेतली. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित विद्यार्थी रेसिडेन्शियल ज्युनिअर कॉलेज परीक्षा केंद्रावर परीक्षा देत होता. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  शनिवारी रात्री पर्यवेक्षकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा-महिलेचा निर्वस्त्र शीर नसलेला मृतदेह, माथेरानमध्ये खळबळ

पोलिसांनी आरोपीकडून कॉपी करण्यासाठी वापरलेला मोबाइल, सॅण्डल, मायक्रोफोन आणि  अन्य एक डिव्हाईस जप्त केलं आहे. आरोपीवर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Ahmednagar, Crime news