अहमदनगर, 22 नोव्हेंबर : कोणाला व्हेज तर कोणाला नॉन- व्हेज खायला आवडते. नाॅन व्हेजवाले झणझणीत मटण, चिकन, मासे कुठे मिळतात याच्या शोधात नेहमीच असतात. त्यात खिशाला परवडेल आणि एकाच ठिकाणी वेगवेगळे प्रकार मिळत असतील तर भारीच!. नगरमध्ये नाॅनव्हेज खवय्यांसाठी खास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल चार महिने या महोत्सवाचा खवय्यांना आस्वाद घेता येणार आहे.
नगरमध्ये नाॅन व्हेज खवय्यांची संख्या मोठी आहे. त्यात मासे तर आवडीने खाल्ले जातात. नगरच्या दामोदर बिर्याणी हाऊसमध्ये मासे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मासे खवय्ये येथे मासे खाण्यासाठी हजेरी लावत आहेत. येथे मासे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात. या कामांमध्ये सर्व कुटुंब एकत्र येऊन हे काम करतात. त्यामुळे त्या पदार्थाची चव अत्यंत स्वादिष्ट होते. नगरपासून जवळ असलेल्या जेजुर जवळील ससेवाडीचे मूळ रहिवासी असणारे राजेंद्र ससे यांनी दामोदर बिर्याणी हाऊस हा व्यवसाय सुरू केलेला आहे.
हातगाडी वर एक किलोची बिर्याणी विकून व्यवसाय सुरू केला. खाण्याची आणि खाऊ घालण्याची आवड असल्यामुळे या व्यवसायात आपण रमलो, अस ते सांगतात. शिक्षण जेमतेम केलं आणि आपण व्यवसाय करायचं म्हणून हॉटेल चालवायला घेतले. सुरुवातीला आचारी पासून वेटरपर्यंत एकमेव तेच होते. मात्र पुढे परिस्थिती बदलली, व्यवसाय जोरदार सुरू झाला. नगर मनमाड रोड पत्रकार चौकाजवळ असणारे दामोदर बिर्याणी हाऊस म्हणून नावलौकिक मिळालं.
संघर्षाला सलाम! उकळत्या तेलातील वडे हातानं काढणाऱ्या महिलेचं 'हे' आहे सत्य
अनेक प्रकारचे मासे उपलब्ध
आपली खाद्य संस्कृती जपत नवं काही तरी करुयात म्हणून गेल्या 4-5 वर्षापासून त्यांच्याकडे माशाचा महोत्सव भरवला जातो. यात इथे अनेक प्रकारचे मासे ते मासे प्रेमींना उपलब्ध करून देतात. सुरमई, कोळंबी, बोंबील,चोपडा, बांगडा, वाम, पापलेट, बेबी सुरमई असे अनेक प्रकारचे मासे इथे असतात, भाऊच्या धक्क्यावरून हे मासे आणले जातात. नोव्हेंबरमध्ये सुरू होणारा हा फिश महोत्सव तब्बल 4 महिने चालतो. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक खवय्ये इथं खास मासे खाण्यासाठी येतात.
स्वयंपाकासाठी महिलांचे हात
जेवणाला स्त्रीचा हात लागला की त्याची चव उत्तम होते असे म्हणले जाते. म्हणून इथे घरच्या स्त्री आनंदाने काम करतात. चपाती, भाकरी बनवण्याचे काम महिलाच करतात. घरातलं किचन जसं स्त्रिया सांभाळतात तसं या हॉटेलात महिलांचेच राज्य आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Local18, Local18 food