Home /News /maharashtra /

Video : अरे देवा! अग्निशमनला दे धक्का...; आपात्कालीन परिस्थितीत नागरिक वाऱ्यावर? भोंगळ कारभाराची पोलखोल

Video : अरे देवा! अग्निशमनला दे धक्का...; आपात्कालीन परिस्थितीत नागरिक वाऱ्यावर? भोंगळ कारभाराची पोलखोल

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता पालिकेच्या भोंगळ कारभाराची पुन्हा एकदा पोलखोल झाली आहे.

    अहमदनगर, 25 जुलै : अग्निशमन दल हे एक महत्त्वाचं दल मानलं जातं. आग लागल्यावर आपत्कालीन स्थितीत अग्निशमनदलाची फार मोलाची मदत होते. मात्र, याच अग्निशमन दलाच्या गाडीबाबत अहमदनगर जिल्ह्यातील राहाता नगरपालिकेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. नेमकं काय घडलं - अहमदनगर जिल्ह्यातील राहाता पालिकेच्या भोंगळ कारभाराची पुन्हा एकदा पोलखोल झाली आहे. राहाता नगरपालिकेच्या अग्निशमन गाडीला चक्क धक्का मारून चालू करावे लागत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तब्बल अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर ही अग्निशमन चालू झाली. मात्र, अत्यावश्यक सेवेच्या बाबतीत पालिका प्रशासन गंभीर नसल्याचे यातून अधोरेखित होत आहे. हेही वाचा - भावामुळे बहीण 6 महिन्यांची गर्भवती; आई-वडील कामानिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर घडला घृणास्पद प्रकार या व्हिडिओत 7-8 लोक या अग्निशमन दलाच्या वाहनाला धक्का देताना दिसत आहेत. अर्धा तासानंतर हे वाहन चालू झाले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरानंतर आपात्कालीन परिस्थितीत नागरिक वाऱ्यावर आहेत का?, असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. तसेच या घटनेच्या निमित्ताने पालिकेच्या भोंगळ कारभाराची पोलखोल झाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ahmednagar

    पुढील बातम्या