मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धरणावर फिरायला गेलेल्या कॉलेज तरुणीचा भयावह अंत, VIDEO च्या नादात गमावला जीव

धरणावर फिरायला गेलेल्या कॉलेज तरुणीचा भयावह अंत, VIDEO च्या नादात गमावला जीव

फोटो- सामना

फोटो- सामना

Death at Bhandardara Dam: अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरात फिरायला गेलेल्या एका महाविद्यालयीन तरुणीचा व्हिडीओ काढण्याच्या नादात जीव गेला आहे.

  • Published by:  News18 Desk

अहमदनगर, 27 मार्च: अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरात फिरायला गेलेल्या एका महाविद्यालयीन तरुणीचा व्हिडीओ काढण्याच्या नादात जीव गेला आहे. संबंधित तरुणी आपल्या काही महाविद्यालयातील मैत्रिणींसोबत भंडारदरा धरण परिसरात फिरायला गेली होती. दरम्यान तिने धरणाच्या भिंतीवर चढून व्हिडीओ शूट केला होता. त्यानंतर तिने हा व्हिडीओ काही मैत्रिणींना पाठवला. याचवेळी तोल जाऊन ती भिंतीवरून 50 फूट दगडी बांधकामावर पडली. यात तिचा दुर्दैवी अंत झाला.

उज्ज्वला बाळू वैराळ असं 17 वर्षीय मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. ती अकोले तालुक्यातील वाकी येथील रहिवासी होती. घटनेच्या दिवशी शुक्रवारी उज्ज्वला वैराळ आपल्या काही महाविद्यालयीन मैत्रिणींसोबत कॉलेजपासून काही अंतरावर असलेल्या भंडारदरा धरण परिसरात फिरायला गेली होती. यावेळी सर्व मुली धरण्याच्या भिंतीवर चढून व्हिडीओ काढण्यात दंग झाल्या होत्या. उज्ज्वलाने देखील भिंतीच्या कडेला दगडी बांधकामाच्या सुरक्षा वॉलवर चढून व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला.

हेही वाचा-एकतर्फी प्रेमातून तरुणाचं विकृत कृत्य; अल्पवयीन मुलीसमोर उरला आत्महत्येचा पर्याय

दरम्यान, तिच्यासोबत आलेल्या सर्व मुली पुन्हा महाविद्यालयात गेल्या. कॉलेजमध्ये परत जाताना उज्ज्वलाबद्दल कोणीच काही बोललं नाही. त्यामुळे ती कॉलेजमध्ये परत आली असावी, असंच सर्वांना वाटलं. दरम्यान या भिंतीवरून जाणाऱ्या एका महिलेला महाविद्यालयात नेण्यात येणारी बॅग आणि एक ओळखपत्र धरण परिसरात आढळलं. यावेळी संशय आल्याने त्यांनी आसपास पाहणी केली. धरणाच्या भिंतीवरून आऊटलेट वॉल्व्हच्या बाजूने तळाकडे डोकावून पाहिलं असता, एक मुलगी खाली पडली असल्याचं त्यांना दिसलं.

हेही वाचा-GFला भेटायला गेलेल्या तरुणासोबत घडला घात; हत्येच्या थरारक घटनेनं जळगाव हादरलं!

हा धक्कादायक प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ धरणावरील पोलीस सुरक्षारक्षकांना याची माहिती दिली. यानंतर राजूर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. आपली मैत्रीण धरण्याच्या भिंतीवरून खाली पडली आणि आपल्याला कळालंही नाही, हे लक्षात येताच उज्ज्वलाच्या अन्य मैत्रिणींना देखील मोठा धक्का बसला. मृत उज्ज्वलाचे वडील बांधकाम व्यावसायिक आहेत. तर ती कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकत होती.

First published:

Tags: Ahmednagar