Home /News /maharashtra /

महात्मा फुले कृषी विद्यापीठात राडा; मध्यरात्री विद्यार्थी एकमेकांवर दगडफेक करतानाचा Video

महात्मा फुले कृषी विद्यापीठात राडा; मध्यरात्री विद्यार्थी एकमेकांवर दगडफेक करतानाचा Video

अधिकृत आणि अनधिकृत विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी कारणावरून रात्री उशिरा वाद सुरू झाला. यात विद्यार्थ्यांनी दगडफेकही सुरू केली.

अहमदनगर 01 ऑगस्ट : महात्मा फुले कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरच विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या एका गटाकडून कुलगुरू कार्यालयात आसरा घेतलेल्या दुसऱ्या गटावर दगडफेक करण्यात आली. Shocking! 11 व्या मजल्यावरुन महिलेने मारली उडी; शेजारच्या खोलीत होतं कुटुंबीय समोर आलेल्या माहितीनुसार, कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी या विद्यापीठात राज्यासह देशभरातून ऑनलाईन विद्यार्थ्यांची निवड केली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 70 हजार रुपये फी भरावी लागते. मात्र विद्यापीठात 168 प्रवेश मर्यादा आहे. अशात जागा न मिळालेले 500 विद्यार्थी विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये अनधिकृतपणे वास्तव्य करत असून त्यांना हॉस्टेल किंवा मेस फी नसल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वादरम्यान अधिकृत आणि अनधिकृत विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी कारणावरून रात्री उशिरा वाद सुरू झाला. यात विद्यार्थ्यांनी दगडफेकही सुरू केली. अधिकृत विद्यार्थ्यांनी जीव वाचविण्यासाठी हॉस्टेलपासून जवळच असलेल्या कुलगुरू कार्यालयात धाव घेत आसरा घेतला. दरम्यान या मुलांना मारण्यासाठी अनधिकृत 500 विद्यार्थ्यांच्या गटाने कुलगुरू कार्यालयावर दगडफेक करण्यास सुरूवात केली. दोन गटातील हा वाद जास्तच वाढल्याने अनेक विद्यार्थी लपून बसले होते. Pune : कार चोरून काढला पळ, मात्र काही सेकंदात चोराचा झाला मारेकरी; Video मधून सत्य उघड सुरक्षा रक्षक आणि प्रशासनाने हस्तक्षेप करत अखेर हा वाद मिटवला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून प्रहार संघटनेचे आप्पासाहेब ढुस यांनी या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Shocking video viral, Students

पुढील बातम्या