मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सुजय विखे कानात काही बोलले अन् अजितदादांनी हात जोडले, ऐन उन्हात नगरमध्ये राजकीय वातावरण तापले, VIDEO

सुजय विखे कानात काही बोलले अन् अजितदादांनी हात जोडले, ऐन उन्हात नगरमध्ये राजकीय वातावरण तापले, VIDEO

विशेष म्हणजे, अजित पवार दुसऱ्या बरोबर बोलत असल्यानं सुजय विखे मागे वाट पाहत बसले आणि त्यानंतर...

विशेष म्हणजे, अजित पवार दुसऱ्या बरोबर बोलत असल्यानं सुजय विखे मागे वाट पाहत बसले आणि त्यानंतर...

विशेष म्हणजे, अजित पवार दुसऱ्या बरोबर बोलत असल्यानं सुजय विखे मागे वाट पाहत बसले आणि त्यानंतर...

 

अहमदनगर, 06 एप्रिल : विखे आणि पवार कुटुंबामधील वाद अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे.  दोन्ही घराण्यात नेहमीच आरोप प्रत्यारोप पाहत आलो. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एक ही संधी या दोन्ही कुटुंबांनी सोडली नाही. मात्र आज शिर्डीत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि भाजपचे खासदार सुजय विखे पाटील (sujay vikhe patil) एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. त्यामुळे सर्वांच्या भुवय्या उंचावल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत शिर्डीतील पोलीस स्टेशनचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर सुजय विखे पाटील सुद्धा हजर होते. यावेळी सुजय विखे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याजवळ जात कानात काही तरी सांगितलं. विशेष म्हणजे, अजित पवार दुसऱ्या बरोबर बोलत असल्यानं सुजय विखे मागे वाट पाहत बसले आणि त्यानंतर अजित पवार यांच्याशी कानात हितगुज केलं.

नेमकी काय चर्चा केली हे स्पष्ट नसलं तरी विखे पवारांनी केलेल्या गप्पा चर्चेचा विषय ठरला. यानंतर कोपरगाव येथे राष्ट्रवादीच्या मंत्री व  पदाधिकारी उपस्थित असलेल्या व्यासपीठावर सुद्धा सुजय विखे यांनी हजेरी लावल्यानं सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे हे मात्र नक्की.

(गोरखनाथ मंदिर हल्ल्यासंदर्भात नवा खुलासा! मुर्तझाच्या घरातून Airgun जप्त)

विशेष म्हणजे, '2 दिवसांपूर्वीच आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही पलटी मारू शकतो' असं सूचक विधान सुजय विखे यांनी केलं होतं. त्यानंतर आज सुजय विखे थेट अजित पवारांच्या शेजारी आल्यामुळे नगरमध्ये राजकीय चर्चांना उधाण आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात बोलत असताना अजित पवार म्हणाले की, कोरोनामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी येत्या दोन वर्षात चार लाख कोटीची विकासकामे करणार आहोत. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून विकास करणार आहोत. मी शब्दाला पक्का आहे दिलेला शब्द पाळणारच. नगर जिल्हा राजकारण, समाजकारण, सहकार क्षेत्रात महत्वाचा जिल्हा आहे.  राज्याला नगर जिल्ह्याने अनेक नेते दिले' असंही अजित पवार म्हणाले.

First published: