मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'आदित्य ठाकरेंनी वडिलांची भाषा शिकावी, संजय राऊतांची नव्हे'; बंडखोरांबाबतच्या 'त्या' विधानानंतर केसरकरांचा सल्ला

'आदित्य ठाकरेंनी वडिलांची भाषा शिकावी, संजय राऊतांची नव्हे'; बंडखोरांबाबतच्या 'त्या' विधानानंतर केसरकरांचा सल्ला

आदित्य ठाकरे अद्याप ही आम्हाला गद्दार म्हणत असतील तर त्यांनी उद्धव ठाकरेंची भाषा शिकावी संजय राऊतांची भाषा शिकू नये, असा सल्ला आदित्य ठाकरे यांना केसरकरांनी दिला.

आदित्य ठाकरे अद्याप ही आम्हाला गद्दार म्हणत असतील तर त्यांनी उद्धव ठाकरेंची भाषा शिकावी संजय राऊतांची भाषा शिकू नये, असा सल्ला आदित्य ठाकरे यांना केसरकरांनी दिला.

आदित्य ठाकरे अद्याप ही आम्हाला गद्दार म्हणत असतील तर त्यांनी उद्धव ठाकरेंची भाषा शिकावी संजय राऊतांची भाषा शिकू नये, असा सल्ला आदित्य ठाकरे यांना केसरकरांनी दिला.

सुनिल दवंगे, प्रतिनिधी

अहमदनगर 08 जुलै : शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील वाद आणि टीका टिपण्णी दिवसेंदिवस आणखी तीव्र होत चालली आहे. तब्बल दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदारांनी बंडखोरी केल्यानं शिवसेनेला (Shivsena Rebel MLA) जोरदार झटका बसला आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली हे आमदार सत्तेत आले आहेत. सत्तांतरानंतर आमदारांकडून पुन्हा मातोश्रीवर जाण्याचे संकेत दिले जात आहेत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंकडून (Aditya Thackeray) आमदारांना गद्दारही म्हटलं जात असल्यानं शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आदित्य ठाकरे अद्याप ही आम्हाला गद्दार म्हणत असतील तर त्यांनी उद्धव ठाकरेंची भाषा शिकावी संजय राऊतांची भाषा शिकू नये, असा सल्ला आदित्य ठाकरे यांना केसरकरांनी शिर्डीत साईबाबा दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना दिला. दिपक केसरकर हे साईबाबांचे निस्सिम भक्त आहेत. गुवाहाटीला असतानादेखील त्यांनी तिथल्या साई मंदिरात जावून बाबांचे दर्शन घेतले होते. गुरुवारी रात्री केसरकर शिर्डीच्या साईबाबा मंदिरात पोहचले. नेहमी प्रमाणे साई समाधीचे दर्शन घेतले. शिंदे गट आणि भाजपाच्यावतीनं साईचरणी लीन झाल्याचं सांगत उठावाला चांगलं यश आल्यानं साईबाबांचे आभार मानण्यासाठी शिर्डीत आल्याचं दिपक केसरकर यांनी सांगितलं.

बाबांचा श्रद्धा आणि सबूरी मंत्र आमच्यासोबत होता त्यामुळे उठावाच्यावेळी आमच्या एका ही आमदाराने तोल ढळू दिला नाही. गैरसमज निर्माण केला जात होता मात्र त्याला समर्पक उत्तर देण्याची बुद्धी साईबाबांनी दिली असल्याचं केसरकर यांनी यावेळी म्हटलं.

भाजपची नवी खेळी; माजी शिवसैनिक उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत, सुरेश प्रभूंना उमेदवारी?

'हा' शब्द भाजपकडून आधीच घेतला -

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माफिया म्हणत वादग्रस्त ट्विट किरीट सोमय्या यांनी केले. हा एक कटू प्रसंग आहे. मात्र आम्ही आधीच भाजपकडून आमचे नेते उद्धव ठाकरे यांना कोणीही डिवचू नये, अपशब्द वापरु नये हा शब्द घेतला आहे. त्यावेळी भाजपचे सर्व आमदार, नेते, शिंदे गटाचे नेते, आमदार यांच्या समक्ष आम्ही शब्द घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी आमची भावना समजून घेत बैठकीतील सर्वांना सांगत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कोणीही अपशब्द बोलणार नाही याची खात्री दिली होती. मात्र दुर्दैवानं त्या बैठकीला किरीट सोमय्या हजर नव्हते. तेव्हा लवकरचं उपमुख्यमंत्री फडणवीस यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करतील. किरीट सोमय्यांच्या ट्विटमुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर पक्षश्रेष्टी सोमय्यांना योग्य ती जाणीव करुन देतील, असं स्पष्ट मत केसरकर यांनी यावेळी व्यक्त केलं.

आदित्य ठाकरेंनी वडिलांची भाषा शिकावी

आदित्य ठाकरे खूप लहान आहेत. मी त्यांच्यापेक्षा दुपट्ट वयाचा आहे. मात्र आदित्य ठाकरे समोर आले तर मी स्वतः उठून उभा राहतो कारण ते बाळासाहेबांचे नातू आहेत. आदित्य यांना जो मान देतो तो बाळासाहेबांचा मान आहे. आदित्य ठाकरे जर बाळासाहेबांचे नातू असतील तर असा शब्द तोंडी येताना त्यांनी दहावेळा विचार करायला हवा. आम्ही खूप बोलू शकतो मात्र बोलणार नाही कारण बाळासाहेबांचा वारसा त्यांच्याकडे आला आहे. तेव्हा त्यांनी कसं बोलावं हे उद्धव ठाकरे यांच्याकडून शिकावं, संजय राऊत यांच्याकडून शिकू नये, असा सल्ला यावेळी केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना दिला आहे.

मोठी बातमी: उद्धव ठाकरेंकडून धनुष्यबाण चिन्ह जाणार?

भावना गवळी यांना हटवणे मनाला लागणारं -

भावना गवळी यांना लोकसभेतील प्रतोप पदावरून दूर केल्याचं कारण संजय राऊत जरी वेगळं सांगत असतील तरी फक्त खासदार फुटतील अशा संशयापोटी ही कारावाई केली असल्यानं शिवसैनिकांच्या मनाला लागलं आहे. बाळासाहेबांनी खासदार भावना गवळी यांना मुलगी मानलं होतं. ते असते तर कुणी त्यांना पदावरून हटवू शकलं नसतं. त्या शिवसेनाच्या पहिल्या खासदार असून पाच वर्ष त्यांनी नेतृत्व केलं आहे. त्यांना जेव्हा पदावरून काढलं गेलं, तेव्हा तो समस्त महिला वर्गाचा अपमान आहे. लोकशाहीमध्ये खासदारांना जो निर्णय घ्यायचा आहे, त्यांना ती मोकळीक आहे. जर बहुमत भाजपसोबत जात असेल तर उद्धव ठाकरे यांनीही सहानुभूतीपुर्वक विचार करावा. मी यावर फार काही बोलू शकतं नाही. नाहीतर त्यांचे प्रवक्ते म्हणतील आम्हीच खासदारांना फूस लावली, असा टोला यानिमित्तानं केसरकर यांनी राऊतांना लगावला आहे.

मध्यवर्ती निवडणुका ट्रायल शंभर टक्के करुशरद पवारसह इतर अनेक नेत्यांनी राज्यात मध्यवर्ती निवडणुकांचे संकेत दिले आहे. यावर बोलतांना केसरकर यांनी म्हणटलं की, शिवसेना विधीमंडळ पक्ष म्हणून शिंदे यांना मान्यता आहे. त्यानंतरच्या निवडणुका मध्ये व्हीप मोडला गेला. आमचं आदित्य ठाकरे यांच्यावर प्रेम आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी 16 ऐवजी 15 आमदारांवर अपात्रतेची कारवाईचा बडगा उगारला आहे. जे नेहमी निवडणुका बद्दल बोलतात त्यांना 15 जागेवर निवडणुका झाल्या की समजेल जनतेच्या मनात काय आहे. मात्र अपात्रतेची कारवाई होणा-या आमदारांना शिंदे गटाकडे येण्याची संधी आहे. एकनाथ शिंदे त्यांना माफ करु शकतात त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या मनात मध्यवर्ती निवडणूकांची ट्रायल असेल तर ती ट्रायल नक्की करु.

First published:

Tags: Aaditya thackeray, Shivsena