Home /News /maharashtra /

जगावेगळं नातं! सासूच्या निधनानंतर सुनेनंही घेतला जगाचा निरोप, नगरमधील हृदयद्रावक घटना

जगावेगळं नातं! सासूच्या निधनानंतर सुनेनंही घेतला जगाचा निरोप, नगरमधील हृदयद्रावक घटना

सासू सुनेचं जगावेगळं नातं; दोघींनी एकाच दिवशी सोडला जीव, नगरमधील हृदयद्रावक घटना

सासू सुनेचं जगावेगळं नातं; दोघींनी एकाच दिवशी सोडला जीव, नगरमधील हृदयद्रावक घटना

Daughter in law and mother-in-law's death in Rahuri: अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहुरी शहरामध्ये सासू-सूनेच्या मृत्यूची दुर्देवी घटना घडली आहे. राहुरी शहरामधील आझाद चौक येथे राहणा-या शेजुळ कुटुंबातील सासू-सूनेचा केवळ अर्ध्या तासाच्या अंतराने मृत्यू झाला.

पुढे वाचा ...
अहमदनगर, 8 जुलै : समाजामध्ये सासू सुनेचे वाद विकोपाला गेल्याच्या अनेक घटना आपण पाहत असतो. सासू सुनेचे वाद सोडवता सोडवता घरच्यांच्या नाकीनऊ येतं. बऱ्याचदा हा कलह इतका वाढतो की, त्यातून अनेक भयानक प्रकार घडतात. परंतु या गोष्टीला छेद देणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरात घडली आहे. सासूचा मृत्यू झाल्याचं समजताच अवघ्या अर्ध्या तासात सुनेचादेखील हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar News) घडलीय. या घटनेनं संपूर्ण राहुरी (Rahuri) शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरामध्ये सासू-सूनेच्या मृत्यूची (Daughter in law and mother-in-law's death) दुर्देवी घटना घडली आहे. राहुरी शहरामधील आझाद चौक येथे राहणा-या शेजुळ कुटुंबातील सासू-सूनेचा केवळ अर्ध्या तासाच्या अंतराने मृत्यू झाला. या कुटुंबातील मालनबाई पांडुरंग शेजुळ यांना 7 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास त्रास जाणवू लागला. उपचारासाठी त्यांना शहारातील एका रुग्णालयात भरती केलं गेलं. मात्र उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मालनबाई यांचा मृत्यू झाला. हेही वाचा: गळती थांबेना! ठाणे, नवी मुंबईनंतर आता या महापालिकेत शिवसेनेला मोठा दणका ही बातमी त्यांच्या घरी समजली. मालतीबाईंच्या मृत्यूची बातमी ऐकून जेमतेम अर्ध्यातासानंतर त्यांच्या सूनबाई मीराबाई भाऊसाहेब शेजुळ यांनाही त्रास होऊ लागला. त्यांना देखील त्याच रुग्णालयात दाखल केलं गेलं. मात्र त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. मालतीबाई आणि मीराबाई या दोघी सासू-सूनांच्या मृत्यूनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर सासू सूनेवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ शेजुळ कुटुंबियांवर आली. एकमेंकींवर मायलेकीसारखं प्रेम करणाऱ्या सासू-सूनेने एकाचवेळी जगाचा निरोप घेतला. सासू-सुनेच्या अशा जाण्यानं शेजुळ कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सासू सुनेचे हे प्रेम पाहून परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
Published by:Suraj Sakunde
First published:

Tags: Ahmednagar News, Death

पुढील बातम्या